किन्हाळा ते मोर्शी रस्त्यावर खुलेआम गावठी दारुविक्री पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष,

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.12
मोर्शी : नजीकच्या किन्हाळा गावात दारुविक्रीला महापूर आला आहे. जागोजागी सर्रास दारुविक्री होत आहे. युवावर्ग व्यसनाच्या आहारी गेला आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड नागरिक करीत आहे. गावात दारुविक्री तसेच अवैध व्यवसाय वाढीस लागले आहे. यामुळे अनेक कुटूंब उध्वस्त होत आहे. विशेष करुन युवावर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी गेला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अंतोरा नजीकच्या किन्हाळा गावात दारुविक्रीला महापूर आला आहे. जागोजागी सर्रास दारुविक्री होत आहे. युवावर्ग व्यसनाच्या आहारी गेला आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड नागरिक करीत आहे. गावात दारुविक्री तसेच अवैध व्यवसाय वाढीस लागले आहे. यामुळे अनेक कुटूंब उध्वस्त होत आहे. विशेष करुन युवावर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी गेला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
किन्हाळा गाव तसेच मोर्शीकडे दुचाकीने दारुची वाहतुक सर्रास सुरु आहे. याबाबत पोलिस ठाण्यात वारंवार तक्रारी करण्यात आल्या. परंतु, याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. यामुळे गावात भांडणे होत आहे. किन्हाळा नजीकच्या अंतोरा, दलपतपुर, चिंचोली, खडकी, अंतोरा, लहान आर्वी सह किन्हाळा गावात दारू पिणा-याची जत्राच पहावयास मिळते. याकडे वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी लक्ष देत गावातील दारुविक्रीला आळा घालावा. अशी मागणी नागरिक करीत आहे.