जासई विद्यालयात चावडी वाचन व गणन कार्यक्रम संपन्न

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.5
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृद्धिंगत करण्याकरिता निपूण महाराष्ट्र अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा व गणित या विषयांसाठी कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे, त्या अनुषंगाने रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्युनिअर कॉलेज, दहागाव विभाग जासई, ता.उरण, जि.रायगड.या विद्यालयात शनिवार दिनांक ५/४/२०२५ रोजी चावडी वाचन व गणन कार्यक्रम संपन्न झाला. विद्यालयाच्या प्राचार्या म्हात्रे के.जी. यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. यामध्ये इयत्ता पाचवीत शिकणारे विद्यार्थी सकाळी शाळेच्या मैदानावर बसून वाचन करीत होते. या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका मुकादम के.एस,इयत्ता पाचवीच्या वर्गशिक्षिका घरत पी.जे,म्हात्रे के.के,ठाकूर एम.एस,प्रा.गाताडी एस.बी. व इतर सेवक वर्ग उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या विद्यालयात वर्षभर विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाते, यामध्ये रयत शिक्षण संस्थेमार्फत व शासनाच्या शैक्षणिक खात्याअंतर्गत असणारे उपक्रम राबवितो. त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षांची देखील तयारी करून घेतली जाते त्या मधील एन.एम.एम.एस.परीक्षेत कु.वेदिका अजय पाटील, कु. वेदाक्षी उत्तम ठाकूर आणि इन्स्पायर अवॉर्ड मध्ये यश राजेभाऊ प्रधान इयत्ता नववी हे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.सन २०२५ – २६ या पुढील शैक्षणिक वर्षापासून या विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय शिकविला जाणार आहे ,तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन या निमित्ताने प्राचार्या सौ.म्हात्रे के.जी. यांनी केले आहे.