शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसह तांत्रिक विद्यालयात संविधान मंदिर लोकार्पण सोहळा संपन्न
जालना/प्रतिनिधी,दि.18
जालना येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आणि शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्रात संविधान मंदिर लोकार्पण सोहळा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते रविवार दि.15 सप्टेंबर 2024 रोजी आभासी पध्दतीने पार पडला.
संस्थेत प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना तसेच समाजातील सर्व घटकांना संविधानाबाबत जागरुकता व संविधानाप्रती आत्मीयता तसेच एकजूटता करण्यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्रात एकाच वेळी हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमावेळी आमदार कैलास गोरंट्याल, भदन्त शाक्यपूत्र धम्मधर थेरो, ॲङ ब्रम्हानंद चव्हाण, उद्योजक विष्णू सोनुने, सतीश जाधव, रोहिदास गंगातिवरे, प्राचार्य पी.डी.उखळीकर, मुख्याध्यापक रजनी शेळके यांच्यासह समाजसेवक, प्रतिष्ठीत नागरिक, पालक, विद्यार्थी, निदेशक, संस्थेतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.