संभाजीनगरमध्ये “संगितमय श्रीमद् भागवत कथा “सप्ताहाचे आयोजन

पुणे/ आत्माराम ढेकळे,दि.27
छत्रपती संभाजीनगर येथे ‘संगितमय श्रीमद् भागवत कथा ‘सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री रामेश्वर महादेव मंदिर, सुपारी हनुमान रोड,पानदरिबा,छत्रपती संभाजीनगर येथे दि.२५ मे पासुन “संगितमय श्रीमद् भागवत कथा “सप्ताहाचे आयोजन दुपारी २.३० ते सायं.६.३० या वेळेत करण्यात आले असुन कथावाचक ह.भ.प. संदीप मुळे (गोंदीकर)हे आहेत.तर दैनंदिन महाआरतीची वेळ संध्या. ६.३० अशी आहे.तसेच या सप्ताहाची सांगता दि.३१ मे २०२४रोजी होणार आहे.यानिमित्त दु.१२ ते ४ पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा.असे आयोजक संजय कमलाकर सराफ व सहआयोजिका सौ.संजना संजय सराफ यांनी आवाहन केले आहे.अशी माहिती अध्यात्म ज्ञान प्रसारक आत्माराम ढेकळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.