pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी जामखेड येथे दुसऱ्यांदा आमरण उपोषण

क्या हुआ तेरा वादा?पुछते है जामखेडवाशी!

0 1 7 4 1 1

अंबड/अनिल भालेकर,दि 4

धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी संदर्भात गेल्या अनेक वर्षापासून मागणी असताना देखील समाजाच्या पदरी निराशाच पडलेली आहे.एसटी आरक्षण अभावी धनगर समाजाचा सामाजिक, शैक्षणिक,राजकीय विकास म्हणावा तसा झालेला दिसून येत नाही. बहुसंख्य प्रमाणात आजही धनगर समाज राना वनात भटकंती करत असताना देखील प्रत्येक राजकीय पक्षाने मतदाना पुरतेच धनगर समाजाचा वापर करत असल्याचे वारंवार दिसून येत आहेत. पोकळ आश्वासनाव्यतिरिक्त धनगर समाजाच्या पदरी निराशाच दिसून येते.
आणि यासंदर्भात जामखेड तालुका अंबड येथे दुसऱ्यांदा आमरण उपोषण करण्यात येत आहे. भगवान (आबा) गोविंद भोजने, देवलाल शिवाजी मंडलिक,भगवान आसाराम भोजने,रामराव उत्तमराव कोल्हे गेल्या सहा दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 1950 भारतीय राज्यघटनेतील 342 व्या कलमानुसार सादर केलेल्या अनुसूचित जमातीच्या सूचित धनगर जमातीची केलेली तरतूद केलेली असताना देखील आज पर्यंत याची अंमलबजावणी झालेली नाही आणि यासंदर्भात दुसऱ्यांदा आमरण उपोषण करण्यात येत आहे.
प्राण गेला तरी बेहतर परंतु आता माघार नाही..! या ठाम भूमिकेवर उपोषणकर्ते न्याय मिळण्याची प्रतीक्षा करत आहे व या संदर्भात समस्त जामखेड वाशी, माता भगिनी, तरुण,विद्यार्थी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दिसून येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे