तिवस्यात अवकाळी पाऊस: मोर्शी चांदूरमध्ये गारपिटीचा, बसला कांद्याला फटका

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.12
वातावरणात झालेल्या बदलामुळे रविवारी सायंकाळपासूनच उकाडा कमी झाला होता. दरम्यान सोमवारी दिवसभर उष्णतेची तीव्रता कमी होतीच. यातच सायंकाळी अचानक वारा सुटला आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. यावेळी शहरातील काही भागात हलक्या पावसाने, तर तिवस्यात अवकाळी पाऊस पडला. तसेच चांदूर बाजारमध्मये गारपिटीचा कांद्याला फटका बसला आहे. वातावरणातील या बदलामुळे सोमवारी तापमानात घट आली असून, येथील श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या हवामान विभागाने कमाल तापमान ४० अंश नोंदवले आहे.दरम्यान मे महिन्याच्या सुरुवातीपासून तापमानात घट झालेली आहे. रविवारी तापमान ४१ अंश, तर सोमवारी ४० अंश तापमान होते. पुढील दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार असून, वेगाने वारे वाहणार आहेत. याच कारणाने शहरासह जिल्ह्यातील काही भागात गारपीट होऊ शकते. हलका व मध्यम पाऊस तर अनेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे.तिवसा शहरात सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन विजांचा कडकडाट झाला. त्या पाठोपाठ वादळी वाऱ्यासह अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून काही काळ दिलासा मिळाला. मात्र शहरात कुठेही कोणतेच नुकसान झाले नाही. सायंकाळी १५ ते २० मिनिटे अचानक आलेल्या पावसाने वाहन चालकांची तारांबळ उडालीहोती.चांदूरमध्ये संत्रा, कांद्याला फटका : चांदूर बाजार व मोर्शी तालुक्यात अचानक झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीमुळे कांदा आणि संत्रा फळपिकाला नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. तालुक्यात काही ठिकाणी वादळी पाऊस तर काही ठिकाणी वादळी पावसासह गारपीट सुद्धा झाली. यामध्ये घाटलाडकी, बेलमंडळी, वनी, ब्राह्मणवाडा थडी, माधान, काजळी, देऊरवाडा, चांदूर बाजार, शिरसगाव बंड या गावांचा समावेश आहे.