pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेशासह विविध परवानगीचे वितरण

0 1 7 9 5 2

जालना/प्रतिनिधी,दि.9

 भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम घोषित करण्यात आला असून 18- जालना लोकसभा मतदारसंघासाठी दि.13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. तरी निवडणूक विषयक कामकाजासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कक्ष स्थापन करण्यात आले असून कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था पथक स्थापन करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था पथकामार्फत आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी सोहम वायाळ यांनी दिली आहे.

प्रतिबंधात्मक आदेशामध्ये  दि.16 मार्च ते 6 जुन 2024 – महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) नूसार ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध, पोलिस अधिकारी यांच्या परवानगी शिवाय ध्वनीक्षेपक वापरास प्रतिबंध सकाळी 6 पुर्वी व रात्री 10 वाजेनंतर ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास प्रतिबंध , फिरते वाहनावर ध्वनीक्षेपकाचा वापरास प्रतिबंध करण्यात आला आहे. दि.16 मार्च ते 6 जुन 2024 – फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नूसार धरणे, आंदोलने, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यास प्रतिबंध तसेच सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय,संस्था, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणी रस्त्याचे ठिकाणी धरणे आंदोलने, मोर्चा, निदर्शने उपोषण करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. दि.16 मार्च ते 6 जुन 2024 – फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नूसार मोटार गाड्या, वाहनांचा ताफ्याचा वापर करण्यास प्रतिबंध, कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणारे उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधींने दहा पेक्षा अधिक मोटारगाड्या, वाहने ताफ्याचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. दि. 16 मार्च ते 6 जुन 2024 – फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 33 (1)(डीबी) नूसार राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणारे उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर निवडणूकीसंबंधी पोस्टर्स, बॅनर्स, कट आऊटस, होर्ल्डींग्ज कमानी लावण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. दि.16 मार्च ते 6 जुन 2024 – फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नूसार धार्मिक स्थळे, रुग्णालये तसेच शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरते प्रचार कार्यालये स्थापन करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. दि.16 मार्च ते 6 जुन 2024 – सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्यांतर्गत प्रतिबंध व्यक्ती, संस्था यांच्याकडून होर्डिग्ज, बॅनर, पोस्टर्स, जाहिराती इत्यादीद्वारे निवडणूकीच्या कालावधीत शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्तेचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष विरुपता करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. दि.16 मार्च ते 6 जुन 2024 – फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नूसार कार्यालये, विश्रामगृह इत्यादी परिसरात मिरवणूका काढण्यास, घोषणा, सभा घेणे, इत्यादीवर निर्बंध लावण्यात आले आहेत.  दि.16 मार्च ते 6 जुन 2024 – खाजगी व्यक्तीच्या जागेवर, सार्वजनिक जागेवर झेंडे, भित्तीपत्रके लावण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. दि.16 मार्च ते 6 जुन 2024 – फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 निवडणूक कालावधीमध्ये जात, धर्म, भाषावार, शिबीराचे आयोजन करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच दि.1 मे ते 15 मे 2024 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) अन्वये आदेश लागु यामध्ये  शस्त्रे, लाठया, सोटे, बंदुके, तलवारी, भाले, चाकू व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणा-या वस्तु जवळ बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आला.  तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आला.    दगड किंवा इतर उपकरणे किंवा (Means of Casting) प्रवर्तक शस्त्रे गोळा करण्यास व जवळ बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आला.   व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणूनबुजून दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण करण्यास, वाद्य वाजविण्यास, गाणे म्हणन्यास प्रतिबंध करण्यात आला.   व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करण्यास प्रतिबंध करण्यात आला.   आवेषी भाषण, अंगविक्षेप, विडंबनापर नकला करण्यास आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजक माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा पत्रे किंवा कोणतीही वस्तु बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आला.  कामावरील अधिकारी व कर्मचारी यांचे व्यतीरिक्त पाच (5) किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई करण्यात आली आहे.

            लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणीसाठी छाननी समितीची बैठक घेवून जिल्ह्यातील परवाना धारकांची 602 शस्त्र जमा करण्यात आली. जालना पोलिस विभागाकडून 4 हजार 539 किलो अवैध गुटखा जप्ती करण्यात आली.  तर गांजा केसेसमध्ये  21 किलो मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध दारु जप्तीमध्ये पोलिस विभागाकडून 11 हजार 426 लिटर तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने 28 हजार 118 लिटर अवैध दारु जप्त केली.  पोलिस विभागाकडून शस्त्र जप्ती कारवाईत 21 तलवारी व 2 पिस्टल जप्त करण्यात आले. निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने दि.8 मे 2024 अखेर एकुण 8 तात्पुरते हेलीपॅड बनविण्यास, हेलिकॉप्टर उतरविण्यास व उड्डानास  परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच जालना लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचारार्थ विविध प्रकारच्या जिल्हास्तरीय परवाना कक्षाकडून 72 परवाने तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावरुन एकुण 359 प्रचार परवानग्या देण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 9 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे