कुंचेली ता. नायगाव येथे आम्ही वारकरी परिवार सेवा भावी संस्था शाखा बोर्डाचे अनावरण व तालुकास्तरीय शाखा नियुक्तीपत्र वितरण ह.भ.प.राम महाराज पांगरगेकर यांचे किर्तनाचे आयोजन

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि.10
नर्सी पासुन जवळच असलेल्या कुंचेली येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य शाखा बोर्डाचे अनावरण व तालुक्यातील अनेक शाखा, कार्यकारिणीची नियुक्तीपत्र वितरण सोहळा दि11फ्रेबु. 2024रोजी सांय.चार वाजता मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात, नामघोषात बोर्डाचे ऊदघाटन संस्थापक अध्यक्ष हभप गुरूवर्य राम महाराज पांगरेकर यांच्या हस्ते होणार आहे..या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन संस्थेचे मार्गदर्शक रावसाहेब पाटील शिराळे, श्रीरामजी पाटील शिंदे, उपाध्यक्ष -गंगाधर हंबर्डे,सचिव -व्यंकटराव पा.जाधव माळकौठेकर, सहसचिव -प्रभाकर पा. पुयड कोषाध्यक्ष -शिवाजी मदमवाड वडगावकर, जिल्हाप्रसिध्दिप्रमुख चंपतराव डाकोरे पाटील,जिल्हा प्रसिद्धी उपप्रमुख अशोक वाघमारे ,जिल्हा प्रसिद्धी कोषाध्यक्ष रामप्रसाद चन्नावार नायगाव तालुका प्रसिद्धी प्रमुख गजानन चौधरी, ,सर्व पदाधिकारी तसेच सर्व शाखा पदाधिकारी. ऊपस्थित राहनार आहेत.
संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष गुरुवर्य ह.भ. प. श्री राम महाराज पांगरेकर यांच्या शुभहस्ते नायगाव तालुक्यातील सर्व आघाडीतील कार्यकारणी शाखा कार्यकारीणी पदाधिकारी याना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येनार आहे.
संस्थापक अध्यक्ष हभप प.पुज्य गुरूवर्य श्री राम महाराज पांगरेकर यांच्या रसाळ ज्ञानामृत वाणीतून आम्ही वारकरी परिवार ही संकल्पना स्पष्टपणे मांडली जानार आहे. त्यांच्या संकल्पनेतून गेल्या सहा वर्षापुर्वी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण करताना फक्त बेचाळीस साधकांना घेऊन सुरू केलेले साधक यावर्षी ते सहा हजार सातशे पन्नास साधक जोडले गेले. तर येणाऱ्या श्रावण महिन्यात ज्ञानेश्वरीमधील ओव्या तेवढे साधक करण्याचा संकल्प केला आहे. तसेच पंढरपूर येथे आम्ही वारकरी परिवाराची धर्मशाळा उभारण्याबाबत माहिती या कार्यक्रमात दिली जानार आहे .तरी सर्व भाविक भक्तांनी धर्माच्या रक्षणासाठी
आपल्या जीवनात अमुलाग्र बदल करून घेण्यासाठी संतसंग हाचयद खरा मार्ग आहे..जीवनामध्ये धार्मिक कार्य करण्यासाठी ज्ञानभक्तीची वृध्दी करून जीवन सुखकर करण्यासाठी भक्तिमार्ग फार महत्त्वाचा आहे..
धार्मिक वातावरण शुध्दीकरण करण्यासाठी गाव तिथे शाखा स्थापन करून दुषित वातावरण शुध्दीकरण करण्यासाठी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेत सहभागी होण्यासाठी सर्व सदभक्तानी कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन नायगाव तालुका अध्यक्ष सोपान गिरे
शंकर आखले,बाबुराव कोलगने,संतोष कदम, बारावी कदम,राजाराम गादेवार, यांनी केले.
या कार्यक्रमात जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व आघाडी मुख्य आघाडी, प्रसिद्धी आघाडी, महिला आघाडी, युवक आघाडी,साधुसंत,भाविक भक्त मंडळी हजारोंच्या संख्येनी भक्तानी लाभ घ्यावा.
कार्यक्रम यशस्वितेसाठी ता नायगाव या.सचिव बालासाहेब यरबडे,शा.अध्यक्ष लक्ष्मणराव भुरे, राचप्पा जिरंगे,शिवा पा.डाकोरे,शंकर भुरे,नागोराव ईबितदार,मारोती बोयाळ,जीवन डाकोरे,ज्ञानेश्वर शिंपाळे,ब्रम्हानंद व्होनराव,राजेंद्र व्होनराव,नागोराव बोयाळ, भगवान शिंपाळे,इंदुबाई बसवदे,विमल जिरंगे,सुरेखा शिंपाळे,उज्ज्वला जिरंगे,इंदुबाई मठवाले,सर्व शाखेतील पदाधिकारी परिश्रम घेत असल्याचे माहिती आम्हि वारकरी परिवार जिल्हा प्रसिध्दिप्रमुख चंपतराव डाक़ोरे पाटिल यांनी दिले आहे .