चित्रकार रुपेश पाटील यांचे ‘ “ग्रामीणता ” विषयांवरील चित्रांचे मुंबई येथील नेहरू आर्ट गॅलरी मध्ये प्रदर्शन.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.14
उरण तालुक्यातील प्रसिद्ध आंतराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार रुपेश पाटील यांच्या “ग्रामीणता ” विषयवारील चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील प्रसिद्ध नेहरू आर्ट गॅलरी मध्ये दिनांक २३ जानेवारी ते २९ जानेवारी या कालावधी मध्ये प्रदर्शित होणार आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन पर्यटन विभागाचे डायरेक्टर हनुमंत हाटे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच या प्रदर्शना साठी प्रमुख पाहुणे म्हणून मोरेश्वर पवार जेष्ठ शिल्पकार अधिव्याख्याता जे. जे स्कुल ऑफ आर्ट, वैज्ञानिक प्रणित पाटील, जेष्ठ चित्रकार श्रीम. दीपा कटारिया मॅडम (अमेरिका), चित्रकार श्रीम. वर्षा मंगलम.( लंडन), अजितदादा पितळे, डॉ.विकास मोरे आदी मान्यवर अतिथी, चित्रकार मित्र या प्रदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत. चित्रकार रुपेश पाटील यांची अनेक प्रदर्शने राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय स्तरावर झाली आहेत. तसेच चित्रकार रुपेश पाटील यांना विविध राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय अवॉर्ड मिळाले आहेत. रुपेश पाटील यांना नेपाळ, झी २४ तास अश्या विविध ठिकाणी चित्रांचे प्रात्येक्षित करण्यासाठी आमंत्रित केले होते. रुपेश पाटील यांचे चित्रे जगभरातील विविध देशात पोहचली आहेत.मुंबईतील प्रसिद्ध नेहरू आर्ट गॅलरी मध्ये दिनांक २३ जानेवारी ते २९ जानेवारी या कालावधीत “ग्रामीणता ” या चित्रप्रदर्शनात प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय चित्रकार रुपेश पाटील यांनी साकारलेली तब्बल ३० चित्रे रसिक प्रेषकांना पाहवयास मिळणार आहे. ग्रामीणतेच दर्शन या चित्र प्रदर्शनात अनुभवता येणार आहे.