pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

काँग्रेसतर्फे अभिनेता दिपराज थळी यांचा विशेष सत्कार

0 1 2 1 1 2

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.6

उरण तालुक्यातील करंजा गावचे सुपूत्र,उत्तम अभिनेता दिपराज चंद्रकांत थळी (करंजा आगरीपाडा) यांना नाट्य क्षेत्रा तील उल्लेखनीय कार्याबद्दल नुकताच लोकराजा शाहू महाराज सन्मान पुरस्कार 2023 ने गौरविण्यात आले होते. तसेच अनेक पुरस्कार मिळवून उरण तालुक्याचे नाव साता समूद्रापलीकडे नेले आहे.एक स्थानिक मराठी कलाकाराचा विशेष कौतुक करण्याच्या उद्देशाने अभिनेता दिपराज थळी यांना काँग्रेसच्या कार्यालयात बोलावून त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी मिलिंद पाडगावकर-वरिष्ठ उपाध्यक्ष रायगड जिल्हा, विनोद म्हात्रे उरण तालुकाध्यक्ष,प्रकाश पाटील अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी,कमलाकर घरत अध्यक्ष रायगड जिल्हा सेवादल,सुनील काटे काँग्रेस कार्यकर्ते,सदानंद पाटील केगाव विभागीय अध्यक्ष,गोपीनाथ मांडेलकर अध्यक्ष उरण तालुका सेवादल,प्रकाश पाटील अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी,अफशा मुखरी अध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी,चंदा मेवाती,बबन कांबळे,भालचंद्र घरत अध्यक्ष विधानसभा मतदारसंघ तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

दिपराज थळी हे उत्तम अभिनेते असून दीपराज यांनी झी मराठी चॅनलवर सुरू असलेली मराठी मालिका ‘तुला शिकविन चांगलाच घडा’ या मालिकेत गण्याची भूमिका उत्तम पणे साकारली आहे. गण्याची भूमिका साकारून दिपराज यांनी लाखो रसिक प्रेषकांची मने जिंकली आहेत. त्यामूळे उरणचे नावलौकीक करणाऱ्या अभिनेता दीपराज थळी यांचा सत्कार करताना विशेष आनंद होत आहे असे गौरवोदगार काँग्रेसचे उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी काढले. या वेळी सत्कार केल्याने अभिनेते दीपराज थळी भारावून गेले. उपस्थित सर्वांचे दीपराज थळी यांनी आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 1 2