जालना आयटीआयमध्ये रोजगार भरती मेळावा संपन्न
जालना/प्रतिनिधी,दि. 23
गुजरात येथील नामांकीत सुझुकी मोटर्स लिमिटेड कंपनी तर्फे जालना येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे दि. 19 ऑक्टोबर रोजी रोजगार भरती मेळावा संपन्न झाला. या भरती मेळाव्याकरिता जालना व बाहेरील जिल्हयातील आयटीआय उत्तीर्ण उमदवार उपस्थित होते. कंपनीतर्फे लेखी परिक्षा व मुलाखातीदवारे विविध व्यवसायातील एकुण 51 उमेदवारांची नोकरीकरीता निवड करण्यात आली. याप्रसंगी सुझुकी मोटर्स, गुजरात येथील एच आर मॅनेजर धर्मराज पाटील व त्यांची टिम उपस्थित होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य तथा सहा. प्रशिक्षणार्थी सल्लागार रजनी शेळके तसेच प्रशिक्षणार्थी सल्लागार ए. एस. धाबे, एस. जी. चव्हाण, वैशाली मोरे, अमोल जैस्वाल, विक्रम शिवतारे. पवन मुंडलिक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाकरीता संस्थेचे प्राचार्य डॉ.पी.डी. उखळीकर यांचे मार्गदर्शन लाभले.