व्हाईस ऑफ मिडीयाचे 10 जुलै रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन ठेवण्यात आले असुून या कार्यक्रमात जिल्ह्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विकासकुमार बागडी यांनी केले आहे.
या संदर्भातील प्रसिध्दी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, येत्या 10 जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमासाठी पत्रकारांनी जास्तीत जास्त संख्यने उपस्थित राहून आपले म्हणण,े समस्या मांडाव्यात असे आवाहन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष विनोद बोरा, व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विंग महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य विकासकुमार बागडी, जिल्हाध्यक्ष अविनाश कव्हळे, मराठवाडा अध्यक्ष राजेश भालेराव, जालना शहराध्यक्ष रवि दानम, साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कोलते, उर्दु विंगचे लियाकत अली खान, अहमद नूर, कैलास फुलारी, महजबीन शेख यांनी केले आहे. आंदोलनात सहभागी होणार्या पत्रकारांनी आपली नोंद विकासकुमार बागडी यांच्याकडे करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.