pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

10 मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

0 3 1 5 8 9

जालना/प्रतिनिधी,दि.29 

उच्च न्यायालय, मुंबई व मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार दिनांक 10 मे, 2025 रोजी जिल्हा व सत्र न्यायालय, जालना येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या लोक अदालतीचा जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा या उद्देशाने लोक अदालत बाबतची माहिती व प्रसिध्दी घरा-घरा पर्यंत पोहचावी या उद्देशाने व लोकांनी जास्तीत जास्त प्रकरणे लोक न्यायालयाच्या माध्यमातून निकाली निघावे या हेतुन राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

लोक अदालतीमध्ये आपली जास्तीत जास्त प्रकरणे ठेवावी यासाठी विधिज्ञ, पक्षकार व शासनाच्या विविध विभागांनी/अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जालना वर्षा एम. मोहिते व सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना प्रणिता पी. भारसाकडे-वाघ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 5 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे