शेगाव – पंढरपूर महामार्गावरील भगवान बाबा नगर, दत्त नगर, पळशी व आनंदगाव सह शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सना – सुगीच्या काळात झालेल्या या आंदोलनामुळे दिड तास महामार्गावर वाहतूक खोळंबली होती.म रा रस्ते विकास महामंडळाकडून एका महिन्याच्या मुदतीत करुन घेण्याची जबाबदारी आष्टी ठाण्याचे सपोनी सचिन इंगेवाड यांनी दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन एका महिन्यासाठी स्थगित करण्यात आले.
आष्टी पासून माजलगाव कडे जाणाऱ्या
शेगाव – पंढरपूर महामार्गाला भगवान बाबा नगर, दत्त नगर, पळशी व आनंदगाव येणाऱ्या
रस्त्यालां जोडला (जांगाशन) नसल्याने या गावांच्या शेतकऱ्यांना उलट्या दिशेने जावें लागते या प्रकारामुळे अनेक अपघात झाले आहेत. पुढील मोठी दुर्घटना टाळण्यासाठी महामार्गाच्या मधोमध असलेले डिव्हायडर तोडून त्या ठिकाणी
जगशेन करणे आवश्यक आहे. या बाबत प्रशासनातील जिल्हा अधिकारी व संबंधित दिंडी महामार्गाचे अधिकाऱ्यांना दिनांक ७ जुलै २०२४ रोजी कळविले होते. परंतू प्रशासन व जालना रस्ते विकास महामंडळाचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याने वरिल गावकऱ्यांच्या वतीने दिनांक ०९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११:३० वाजेपासून १:०० पर्यंत दिड तास रास्ता रोको जगसेन (रास्ता जोडो) आंदोलन करण्यात आले.दरम्यान म रा रस्ते विकास महामंडळाकडून एका महिन्याच्या मुदतीत वरिल काम पुर्ण करुन देण्याचे आश्वासन आष्टी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड यांना फोनद्वारे दिले. हे काम कार्यकारी अभियंता यांच्याकडून करुन देण्याच्या जबाबदारी आष्टी ठाण्याचे सपोनी सचिन इंगेवाड यांनी शेतकरी आंदोलकांना दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन एका महिन्यासाठी स्थगित करण्यात आले. यावेळी सुग्रीव मुंडे, प्रवीण चौरे, रमेश (बंडू) नांगरे,हनुमान वाघमारे, कल्याण कारभारी, रामा डुरे बबन चौरे प्रवीण चौरे माऊली चौरे अशोक घुले मारुती चौरे सचिन तिडके सिद्धेश्वर राग माऊली चौरे पिंटू घुले उत्तम चौरे राजेभाऊ आघाव नंदू गांजेअंगद मुंडे संदीप नांगरे दत्ता तिडके दत्ता चौरे परमेश्वर चौरे कृष्णा चौरे आबा चौरे भारत तिडके कानिफ नांगरे बाळू मोरे सोपान वाघमारे सुरेश केदार लक्ष्मण चौरे दत्ता वाघ अर्जुन घुले बालासाहेब चौरे सखाराम चौरे महिपती चौरे बाबुराव चौरे विशाल मुंडे भीमा गायकवाड कृष्णा गायकवाड विशाल चौरे सचिन राख आकाश धुळे बाबासाहेब चौरे नवनाथ नांगरे सतीश नांगरे पोपट चौरे भाऊसाहेब व्यवहारे जिजा शिंदे कृष्णा मोठे यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.