pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

दिवंगत ज्येष्ठ कामगार नेते श्री श्याम पदाजी म्हात्रे यांच्या पाचवे पुण्यस्मरण निमित्त विविध मान्यवरांची आदरांजली.

आजही जनतेच्या मनात आहेत शाम म्हात्रे साहेब

0 1 7 4 0 8

उरण दि 9(विठ्ठल ममताबादे )

दिवंगत ज्येष्ठ कामगार नेते श्री श्याम पदाजी म्हात्रे साहेब यांचे पाचवे पुण्यस्मरण खांदा कॉलनी येथे राहत्या घरी त्यांच्या सुकन्या कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांनी आयोजित केले होते. या ठिकाणी असंख्य कार्यकर्त्यांनी व साहेबांवर अविरत प्रेम आणि श्रद्धा ठेवणाऱ्यांनी भेट दिली. यामध्ये विविध पक्षातील नेते कार्यकर्ते समस्त कामगार वर्ग तसेच रोज बाजारातील विविध ठिकाणातील रोज बाजारातील व्यापारी वर्ग आणि आगरी शिक्षण संस्थेतील समस्त परिवार यांनी या ठिकाणी उपस्थित राहून आदरांजली वाहिली . तसेच आगरी शिक्षण संस्थेमध्ये ,गणेश मार्केट आणि काँग्रेस भवन येथे कामगार नेते श्याम म्हात्रे साहेब यांच्या प्रतिमेला पूजन करून आदरांजली वाहण्यात आली.
श्याम म्हात्रे साहेबांचे कार्य महाराष्ट्रभर असल्याकारणाने आजही ते जनमानसांच्या हृदयात घर करून आहेत. हे त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ जमा झालेल्या गर्दीतून कळून येते.तळागाळातील गोरगरिबांना व आगरी समाज, ओबीसी वर्गाला न्याय हक्क मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून ते कायम लढत राहिले.शाम म्हात्रे साहेबांचे हेच कार्य व विचार त्यांची कन्या पुढे नेत असून वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त सामाजिक बांधिलकीतून त्यांनी आई एकविरा जनकल्याण संस्था गोशाळेला आर्थिक मदत करून मदतीचा हात दिला. सदर मदत ह.भ.प सौ.कलावतीताई शिवकर (समाज प्रबोधनकार )केळवणे यांना सुपूर्द केला.

 

 

फायटर शाम म्हात्रे साहेबांची माहिती :-

आदरणीय श्याम म्हात्रे साहेबांच्या प्रेरणादायी विचारांना सलाम आणि विनम्र अभिवादन. साहेबांना जाऊन आज पाच वर्षे झाली. म्हात्रे साहेबांच्या विचारांची पूर्वीपेक्षाही आज नितांत गरज आहे. नवी मुंबई शहर, सिडको, एमआयडीसी या आस्थापनांच्या पूर्वीच्या पिढीचे ते बिनीचे शिलेदार होते. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला नसता तर महाराष्ट्र विधिमंडळातील रायगड जिल्ह्याचे सुपुत्र विरोधी पक्षनेते आदरणीय दत्ता पाटील साहेब, प्रकल्पग्रस्तांचे मसीहा दिबा पाटील साहेब यांच्या तोडीचा नेता इथल्या मतदारसंघाला लाभला असता. ओबीसी जनगणना, मंडल आयोग, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन असा त्यांच्या अभ्यासाचा आवाका मोठा होता. राज्यस्तरीय कृती समित्यांवर त्यांनी आपल्या नावाचा ठसा उमटवला होता. शेतकरी कामगार पक्षाच्या विरोधात जरी त्यांनी निवडणुका लढवल्या असल्या तरी शेतकरी, कामगार आणि प्रकल्पग्रस्त हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता, किंबहुना जगण्याचे ते एक महत्त्वाचे कारण राहिले. गोरगरिबांच्या लेकरांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवून देण्यासाठी आगरी शिक्षण संस्था त्यांनी नावारूपाला आणली. हातावरचे पोट असणाऱ्या रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी त्यांनी रोजबाजार उभारले. कष्टकऱ्यांच्या कल्याणासाठी म्हात्रे साहेबांनी आपली हयात खर्ची घातली.. रस्त्यावरची आंदोलने केली. अनेक केसेस अंगावर घेतल्या. पेण तामसी बंदरच्या लढ्यात साथी गजानन थळे आणि इतर कार्यकर्त्यांसमवेत ते काही दिवस पोलीस कस्टडीत होते..

श्याम म्हात्रे साहेब राजकारणी असते तर निवडणूक जिंकण्याची तंत्रे त्यांनी आत्मसात केली असती. केवळ समाजहिताचा कळवळा त्यांच्या ठायी होता म्हणून स्वतःच्या नोकरीवर त्यांनी पाणी सोडले. कुटुंब चालवण्यासाठी त्यांच्या सौभाग्यवती मात्र नोकरीवर कार्यरत राहिल्या. सकाळीच घरी आलेल्या कार्यकर्त्यांना स्वतःच्या हाताने ते चहा बनवून देत असतात. त्यांच्यासाठी ते रात्री बेरात्री सुद्धा धावून जात असत. रहेजा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर डायबेटीक फूट सर्जरी झाली होती. डॉक्टरांच्या सक्त विश्रांतीचा सल्ला धुडकावून लावत बी एम टी सी च्या भावंडांसाठी त्याही अवस्थेत ते सभा घेत होते. असे लोकप्रतिनिधी सध्या दुर्लभ झाले आहेत.

म्हात्रे साहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा जैविक आणि वैचारिक वारसा त्यांची कन्या श्रुती म्हात्रे तितक्याच ताकतीने पुढे चालवताना दिसते आहे. आर्किटेक्ट, डॉक्टरेट आणि आता वकिलीचेही शिक्षण घेत आहे. ज्ञानाबरोबरच पुरेसं समाजभान तिला आलेलं आहे. साहेबांप्रमाणेच धर्मनिरपेक्षता आणि सहिष्णुता ही मूल्य ती जगते आहे. तिने हाती घेतलेल्या विधायक कामांना आपण बळ देऊया.आणि हिच खरी शाम म्हात्रे साहेबांना आदरांजली असेल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे