pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

प्रतिभा माध्यमिक विद्यालय,काजळा या विद्यालयाने यावर्षी निकालाची परंपरा कायम राखली…

निकालात मुलींची बाजी..

0 1 7 3 9 3

काजळा/प्रतिनिधी, दि.2

काजळा – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ औरंगाबाद यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या इ. 10 वीच्या परीक्षेमध्ये यावर्षी प्रतिभा माध्यमिक विद्यालय,काजळा या विद्यालयाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निकालाची परंपरा कायम राखली. विद्यालयाचा निकाल 94.54% इतका लागला आहे. यावर्षी शाळेतून 55 विद्यार्थी मार्च 2023 च्या परीक्षेला बसले होते त्यापैकी 53 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. विद्यालयातून  शुभम बालाजी गरड हा सर्वप्रथम आला ( 87.00%),कु. सिरीन बाबू सय्यद ही विद्यार्थिनी सर्व द्वितीय (85.40%),तर कु. मोनिका ऋषिकेश कुटे (85.20%) तृतीय आली आहे.55 विद्यार्थ्यांपैकी 16 विद्यार्थी हे डिस्टिंक्शन मध्ये उत्तीर्ण झाले आहे.राधेश्याम अशोक गरड 84.60%, आम्रपाली अशोक बोबडे 83.20%, वैष्णवी रघुनाथ कोळेकर 83.00%, किर्ती घनश्याम देवकाते 82.40%, गायत्री शांताराम वडगावकर 81.60%, कृष्णा अप्पासाहेब पैठणे 81.40%, आरती दिलीप पैठणे 81.20%, साक्षी पांडुरंग बडवणे 80.80%, ऋतिका बाबासाहेब बोबडे 79.80%, प्रियंका बदाम भोसले 79.60%, साक्षी रामेश्वर भोसले 77.80%, गणेश शंकर खंडेकर 75.20%.

सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे  सचिव मा. श्री सुदामभाऊ शिंदे, मुख्याध्यापक श्री गुजर सूर्यकांत तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन व सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे तसेच यावेळी बदनापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. कुमावत साहेब, शिक्षण विस्तार, अधिकारी श्री. क्षिरसागर साहेब, केंद्रप्रमुख अण्णासाहेब खिल्लारे साहेब, सरपंच – उपसरपंच गावकरी मंडळी यांनी यावेळी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले व पुढील वाटचाली करता शुभेच्छा दिल्या.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 3 9 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे