माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा “ड्रीम प्रोजेक्ट” प्रत्यक्षात !

जालना/प्रतिनिधी,दि.11
जालना-जळगाव या नवीन लोहमार्गासाठी आता केंद्रीय मंत्रिमंडळानेही ‘ग्रीन सिग्नल’ दिला आहे. रेल्वे बोर्डाच्या प्रस्तावावर केंद्राने शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे जालना लोकसभा मतदारसंघासह मराठवाड्याच्या विकासाला हातभार लागणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या भागीदारीतून हा नवीन लोहमार्ग होणार आहे. राज्य सरकारने आपला ५० टक्के हिस्सा यापूर्वीच मंजूर केला आहे. रावसाहेब पाटील दानवे हे रेल्वे राज्यमंत्री असतांना, त्यांनीच या लोहमार्गाचा प्रस्ताव सादर केला होता.
या संदर्भात दानवे यांनी जालना येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी बोलताना म्हणाले कि “दिल्लीमध्ये या देशाचे लाडके पंतप्रधान मा. श्री नरेंद्र भाई मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली, या बैठकीमध्ये अत्यंत महत्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने केंद्रीय मंत्रिमंडळाने देशातील आठ नव्या रेल्वेमार्गांना शुक्रवारी मंजुरी दिली. यामधील सर्वात जास्त लांबीचा जालना-जळगाव या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गाचा समावेश आहे.जालना ते जळगाव या १७४ किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे प्रकल्पाला आज मंजुरी दिली आहे. याबद्दल मी आपले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव तसेच या कार्यासाठी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी मेहनत घेतली त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो व अभिनंदन करतो.
हा प्रकल्प फक्त जालना-संभाजीनगरच नव्हे तर संपूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा असा हा रेल्वे मार्ग ज्यासाठी मागील ३ वर्षांपासून पाठपुरावा करीत होतो तो आज मंजूर झाला आहे. मला सांगायला अतिशय आनंद होत आहे कि, १७४ किमीचा हा रेल्वेमार्ग मराठवाडा आणि खान्देशाला जोडणारा प्रकल्प आहे. यासाठी ७ हजार १०५ कोटी ४३ लाख रुपये खर्च अपेक्षित असून राज्य सरकारने यापूर्वीच ५० टक्के खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात केली होती. आता केंद्रानेही मंजुरी दिल्याने या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असून २०३१ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.”
हा रेल्वे मार्ग जालना, राजूर, भोकरदन, सिल्लोडमार्गे गोळेगाव, अजिंठा, फर्दापूर, जळगाव असा जाणार आहे. सुरत (गुजरात), राजस्थानच्या गाड्यांना आंध्र प्रदेश, दक्षिण भारताकडे जाण्यासाठी छोटा मार्ग म्हणून या मार्गाचा फायदा होईल. त्यामुळे येथील व्यापारी, उद्योजक, शेती, व्यापार, दळणवळण, लघुउद्योग, पर्यटन विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
जालना-जळगाव या नवीन लोहमार्गासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘ग्रीन सिग्नल’ दिला असल्यामुळे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन निर्णयाचे स्वागत केले व भाजपा पदाधिकऱ्यांच्या सोबत बालाजी चौक, स्वातंत्रय विर सावरकर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाके फोडून व पेढे वाटून मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला.यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, प्रदेश निमंत्रित सदस्य राजेशजी राऊत,जालना विधानसभा प्रमुख भास्कर आबा दानवे, भाजप महानगराध्यक्ष अशोकजी पांगारकर, अर्जुनजी गेही, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष धनराज काबलीये, जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायकजी मुळे, सुनील खरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्याताई देठे,महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस अरुणताई जाधव,विजय कामड, शिवराज जाधव, महानगर महिला मोर्चा अध्यक्षा शुभांगीताई देशपांडे, बबनराव सिरसाठ, भगवानराव नागवे, अमोल कारंजेकर,डोंगरसिंग साबळे, आनंद झारखंडे, सोमेश काबलिये,शितलप्रसाद पांण्डे,बाबुराव भवर,संजय डोंगरे, रोहीत नलावडे, मुकेश चव्हाण,नागेश अंभोरे , विठ्ठल नरवडे,कैलास सोळुंके,गोवर्धन उबाळे, समर्पण विजयसेनानी,अकबर परसुवाले,कैलास पवार तसेच इतर भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाबासाहेब पाटील कोलते
प्रसिध्दीप्रमुख,
भारतीय जनता पार्टी जिल्हा जालना मो.9860707500