महाराष्ट्र
जालना रोडवरील भीषण अपघातात एक ठार तर पाच जण जखमी.

जालना/प्रतिनिधी:दि.25
जालना बीड रस्त्यावर झिरपी पाटीजवळ मारुती सुझुकी कार (MH 21 BF 1847) व मोटरसायकल (MH21 z 8520) यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण जागीच ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. सायंकाळी हा अपघात झाला.अपघातात गोंदी येथील रहिवासी असणारे व धाकलगाव येथे मेडिकल व्यवसाय करणारे शे.शकुर शे.अब्दुल सौदागर वय(33) वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला तर वॅगनार गाडी मधून प्रवास करणारे सुभाष पाटेकर रा. सुखापुरी, गोटू चंदर जाधव रा.कुंभार पिंपळगाव, पंडित गायकवाड रा. अंबड, दिलीप निकम निजामपूर, बाळकृष्ण जाधव निजामपूर हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.यापैकी सुभाष पाटेकर व प्रकाश गायकवाड या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना जालना येथील येथील खासगी रुग्णालयमध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलेले आहे.