नव दाम्पत्याच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण

नांदेड/प्रभाकर डुरके,दि.4
जोपर्यंत जी वस्तु आपल्याला सहज उपलब्ध होते तोपर्यंत तिचे मोल कधीच केले जात नसते. पण कोरोनाच्या काळात रुग्णांना कृत्रिम आक्सिजनचा तुटवडा पडल्यानंतर सर्वांना त्यांची किंमत समजलेली होती. वृक्षतोडीमुळे भविष्यातील परीस्थिती लक्षात घेऊन शासन वृक्ष लागवड करुन संगोपनासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे.तर शासनाच्या या उपक्रमात निस्वार्थी भावनेने अनेक सामाजिक संस्था वृक्षप्रेमी वृक्षारोपण करून संगोपनासाठी पुढाकार घेत आहेत. हदगांव तालुक्यात संगोपनाची जबाबदारी होईल अश्या अनेक ठिकाणी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून जिवनांकुंर बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेने वृक्ष लागवड करण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यांच्या या सामाजिक कार्यात अनेक कुटुंबे सहभागी होत आहेत. हस्तरा येथील परडे कुटुंबातील विवाह सोहळा संपन्न झाला असल्याने वर भिमाशंकर वधू आरती या नववधुवराने बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात वड,पिंपळ,औदुबंर या वृक्षांची आपल्या हस्ते लागवड करुन सामाजिक कार्यात सहभाग घेतला.
यावेळी बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.साहेबराव भिसे, जिवनांकुर सेवा भावी संस्थेचे संस्थापक हरिश्चंद्र चिल्लोरे, आरोग्य सेविका टेकाळे ,सेवक बापुराव थाटे, लक्ष्मणराव परडे,विष्णुपंत परडे,प्रा.बालाप्रसाद परडे,अरुण परडे,रुपलाल रोकडे,गोरोबा परडे,गोपीचंद बमरुळे,राधाजी जोरुळे,आरोग्य कर्मचार्यांसह वर्हाडी मंडळी उपस्थित होते.