pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

संस्थेचे सचिव श्री विकास सवाई सर यांच्या मार्गदर्शनाखाली “बालिका दिन” उत्साहात साजरा

0 1 7 4 0 8

छ. संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.3

आज दिनांक :- 03/01/2024 वार:- बुधवार रोजी राजर्षी शाहू विद्यालय व गॅलक्सि इंग्लिश स्कूल रांजणगाव शे.पू.येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती देवकर मॅडम व प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच श्रीमती कांताताई जाधव समाजसेविका मोहिनीताई बडे,समाजसेविका रंजनाताई सोनवणे व पालक प्रतिनिधी उपस्थित होते.गावामधून प्रभात फेरी काढण्यात आली. मान्यवरांनी सावित्रीबाई फुले “यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून . त्यांच्या जीवनचरित्राविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच मुलीनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारली. तसेच विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन श्रीमती मनीषा जाधव मॅडम यांनी केले तसेच आभार कु.कोमल तांबेकर मॅडम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे