pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

भाजपमध्ये अशोक पांगारकर यांना डावलले जात असल्याची सकल तेली समाजाची भावना

समाज बांधवांनी घेतली दानवे यांची भेट

0 1 7 4 7 7
जालना/प्रतिनीधी,दि.8
जालना शहरातील तेली समाजाचे अध्यक्ष तथा भाजप ओबीसी मोर्चाचे नेते माजी नगरसेवक अशोक पांगारकर यांना जालना जिल्ह्यातील भाजपमध्ये डावलले जात असल्याची भावना सकल तेली समाजाने व्यक्त केली आहे. ही बाब समाजाने खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन व लेखी निवेदन सादर करून स्पष्ट केली आहे, हे विशेष.
       काल रविवारी जालना शहरातील सकल तेली समाजाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जालना शहरातील भाजपच्या स्थानिक कार्यक्रमात भाजपच्या ओबीसी मोर्चाचे नेते तसेच माजी नगरसेवक व तेली समाजाचे अध्यक्ष अशोक पांगारकर यांना भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून पक्षीय कार्यक्रमातून डावलले जात असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.गत काही महिन्यापासून भाजपच्या सार्वजनिक कार्यक्रम, विविध बॅनर, पोस्टर, पॉम्पलेट इत्यादी मधून अशोक पांगारकर यांना डावलल्याचे सत्य आहे,अशी भावना या बैठकीत समाज बांधवांनी व्यक्त केली.यामुळे  समाजात संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.महाराष्ट्रात सर्व जिल्हे, तालुका, ग्रामपंचायत पातळीवर भाजपच्या नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक झाली आहे. मात्र जालना महानगर शहर प्रमुखांची नेमणुक प्रतिक्षेत आहे. या पदासाठी अशोक पांगारकर हे पात्र असल्याची समाज बांधवांची भावना आहे,अशोक पांगारकर यांना पक्षीय कार्यक्रमातून न डावलता त्यांना न्याय द्यावा,अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली.
       या बैठकीस मनोहरराव  सिनगारे, लक्ष्मणराव क्षीरसागर, बाबुराव व्यवहारे,बाबुराव आंबेकर , नानासाहेब वाघचौरे , सखाराम मिसाळ, चंद्रकांत उबाळे ,प्रकाश राऊत,विजय राजभोज, विश्वनाथ क्षीरसागर,राजेंद्र वाघमारे,लक्ष्मण राऊत,मोहनराव अबोले, तुकाराम मिसाळ, पांडूरंग क्षीरसागर,भारत पेंढारकर, सोपान पेंठारकर, पदमनाथ क्षीरसागर , जनार्दन  व्यवहारे, बाबुराव भवर, प्रकाश राऊत, रामेश्वर गडगीळे,डॉ.प्रदीप पंडीत, डॉ.धारूरकर,डॉ.भानुदास सुरवसे,इंजि.रामेश्वर कोरडे,रमेश गाढे,दत्ता राऊत, अनिल व्यवहारे, अशोक मिसाळ यांच्यासह सकल तेली समाजातील ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. दरम्यान,सकल तेली समाजाच्या शिष्टमंडळाने खासदार रावसाहेब दानवे  यांची जालना शहरातील निवासस्थानी जावून भेट घेतली व उपरोक्त विषयांवर त्यांच्याशी चर्चा करून समाजाच्या भावना सांगितल्या तसेच त्यांना निवेदनही सादर  केले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 7 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे