अंगणवाडीतील आहार वाटपाच्या वर्षांपासून थकीत देयकासह अडचणीची सोडवण्याची सविता निमडगे यांची मागणी

हदगाव/ प्रभाकर डुरके,दि.17
प्राथमिक शिक्षण चा श्रीगणेशा असलेल्या अंगणवाडीत गेल्या १० महिण्यापासून दोन वेळा ताजा आहार वाटप केलेल्या महिला बचत गटाचे देयके शासनाकडून निधी उपलब्ध नसल्याने मार्च पासुन थकीत आहे. यामुळे महिला बचत गटावर उपासमारीची वेळ आली असल्याने थकीत देयके तात्काळ द्याव्यीत. चार डिसेबंर पासून अंगणवाडी कर्मचारी संपावर असल्याने ग्रामीण भागात पालकांचे शैक्षणिक नुकसानीसह विविध विषयांचे गांभीर्य लक्षात घेता या विषयावर तातडीने निर्णय घ्यावा. ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासन निर्णयानुसार प्रत्येक गावातील आहार वाटपाचे काम महिला बचत गटांना द्यावे. पुर्वीप्रमाणे आहार वाटप करणाऱ्या महिला बचत गटास स्वस्त धान्य दुकानातून गहु, तांदुळ, दरमहा उपलब्ध करुन द्यावा. हदगांव तालुक्यात नऊ विभागासाठी तीनच पर्यवेक्षिका आहेत. नऊ विभाग लक्षात विभागनुसार पर्यवेक्षिका उपलब्ध करून द्याव्यात. अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या सविता विनोद निमडगे पळसेकर यांनी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली असून सोमवार पंधरा जानेवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी जिल्हाधिकारी महेश वडदकर यांना निवेदन दिले आहे.