महिलांना लोकसभा व विधानसभेत 33% टक्के आरक्षणाचा ठराव मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे भाजपा महिला मोर्चा कढून आभार- भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्या संध्याताई देठे

जालना/प्रतिनिधी,दि.21
भारत देशातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भारत देशातील महिलांना 33% टक्के जागा राखीव ठेवण्याचा ठराव नुकताच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी लोकसभेत मांडल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे आभार व स्वागत भाजपा महिला मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्या संध्याताई देठे व भाजपा पदाधिकारी यांनी भाजपा जिल्हा कार्यालय जालना येथे जल्लोष कार्यक्रम साजरा केला.
यावेळी भाजप प्रदेश कार्य समिती सदस्य संध्याताई देठे म्हणाल्या की, देशातील महिलांना सक्षम करण्यासाठी पंतप्रधान मोदी साहेबांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या धर्तीवरच आता लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सुद्धा महिलांना 33% टक्के जागा राखीव केल्यामुळे देशातील जास्तीत जास्त महिला राष्ट्रीय राजकारणात सहभाग घेणार आहे.
यावेळी भाजप सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष शुभांगीताई देशपांडे ,अरुणा जाधव ,मीना गायकवाड , पुष्पा मेहेत्रे,वैशाली बनसोडे, वंदना ढगे ,उषा राठोड, सविता वाडेकर आदी उपस्थित होते