जाफराबाद तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना तेली सेना गुणवंत विद्यार्थी पुरस्कार प्रदान

जालना/प्रतिनिधी, दि 8
तेली सेना गुणवंत विद्यार्थी आणि समाजभूषण पुरस्कार संभाजीनगर येथे आयोजित झालेल्या कार्यक्रमांमध्ये जाफराबाद तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी वैष्णवी दामोदर साळवे, गायत्री नंदकिशोर साळवे, श्रुती श्रीरंग साळवे, विनायक रवी टोम्पे,ओमकार रवी टोम्पे, पूजा ज्ञानेश्वर दांडयत,भाग्यश्री विठ्ठल डोंमळे यांचा गुणवंत विद्यार्थी म्हणून सत्कार करण्यात आला अँड वैष्णवी सूर्यकांत साळवे, रवी भिकाजी टोंपे यांचा समाज भूषण पुरस्कार 2025 तेली सेना संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला त्यावेळेस गणेश पवार, ह.भ.प जान्हवी ताई मिसाळ , बोरसे महाराज सूर्यकांत साळवे,सुनील साळवे, उषा सूर्यकांत साळवे, रेखा टोम्पे, श्रीरंग साळवे,नंदकिशोर साळवे,गणेश भवर इत्यादी उपस्थित होते.



