pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

हदगांव येथील महादेव मठात गुरुपौर्णिमा विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरी

0 1 7 4 1 5

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.5

हदगांव तालुक्यातील बरडशेवाळा पळसा मनाठा बामणी फाटा पिंपरखेड मार्लेगाव नेवरी नेवरवाडी करमोडी उंचाडा शिबदरा सावरगाव माळ जगापुर माळझरा चिंचगव्हान कार्ला खरबी चोंरबा केदारनाथ तळेगाव डोरली पिंगळी कवाना गारगव्हान रुई धानोरा सह परिसरात सोमवार तिन जुलै रोजी गुरुपौर्णिमा ठिक ठिकाणी विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली. गुरुपौर्णिमेनिमित्त अनेकांनी परीसराच्या मंदिरातील गुरुचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती.
हदगांव शहरातील महादेव मठ संस्थानात सद्गुरू शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमेनिमित्त विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमाने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.यावेळी तालुक्यातील दहावी बारावी विशेष प्राविण्य मिळवलेल्या शालेय विद्यार्थ्यांसह शिष्यवृत्ती मध्ये यश संपादन करणा-या विद्यार्थ्यांचा परमर्श ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित भाविकांना शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी गुरुपौर्णिमा दिनाविषयी व्यास ऋषी मुनी चा इतीहास सांगत प्रत्येकाने आपले पहिले गुरू असलेले आईवडील व आपल्या पैक्षा मोठ्या व्यक्तीचा आदर केला पाहिजे असे सांगत सध्याच्या परिस्थितीत तरुण पिढी व्यसनाधीन बनत असल्याची खंत व्यक्त करीत त्यांनी व्यसनाधीन होवु नये यासाठी मार्गदर्शन केले.सस्थानांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी हदगांव शहरासह ग्रामीण भागातील विरशैव लिंगायत समाज बांधव, भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे