निवडणूक निरीक्षक (जनरल) शैलबाला अंजना मार्टीन यांनी विविध मतदान केंद्रांची केली पाहणी मतदारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात

जालना/प्रतिनिधी,दि.03
निवडणूक निरीक्षक (जनरल) शैलबाला अंजना मार्टीन यांनी आज विविध मतदान केंद्रांची पाहणी करुन तेथील सुविधांचा आढावा घेतला.
प्रारंभी त्यांनी जालना शहरातील मतदान केंद्रांना भेट दिली. जालना शहरातील श्री सरस्वती भूवन विद्यालयातील मतदान केंद्राची पाहणी केली. त्यानंतर श्री.एम.एस. जैन इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्राला भेट दिली. बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंबड तालुक्यातील जामखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रांना भेट दिली. मतदारांना मतदानाचा हक्क व्यवस्थित बजावता यावा यासाठी मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा तातडीने उपलब्ध करुन द्याव्यात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची व्यवस्था करावी. वृध्द व्यक्ती, दिव्यागांना कुठलीही अडचण भासू देऊ नये. त्यांच्यासाठी रॅम्प तसेच व्हिलचेअरची व्यवस्था असावी, अशा सूचना श्रीमती मार्टीन यांनी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या. गोला पांगरी येथील स्थिर सर्वेक्षण पथकाचीही त्यांनी पाहणी करुन नोंदींची तपासणी केली. निवडणुकीशी संबंधित सोपविलेली कामे जबाबदारी आणि दक्षतेने करावीत. सर्व नोंदी अद्यावत ठेवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी तहसिलदार छाया पवार, तहसिलदार चंद्रकांत शेळके, तहसिलदार योगीता खटावकर, बीएलओ व इतर निवडणुकीशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.