सरस्वती भुवन प्रशालामध्ये राज्य़ क्रीडा दिनाचे उत्साहात साजरा

जालना/प्रतिनिधी,दि. 16
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने “ राज्य़ क्रीडा दिन ”आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्ताने सरस्वती भुवन प्रशाला,जालना येथे ऑलिंपिकवीर दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्म़ दिन “ राज्य़ क्रीडा दिन ” म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
दि.15 जानेवारी 2025 रोजी स.भु.प्रशाला जालना येथे ऑलिपिंकवीर खाशाबा जाधव यांची जीवनगाथा व त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान व “देशात शांतता राहावी यात युवकांची कर्तव्ये” या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तसेच महान कुस्तीपटु “खाशाबा जाधव “यांची जयंती साजरी करण्यात आली.या प्रसंगी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दिलीपकुमार महाजन,प्रमुख अतिथी ॲड कांचन थोरवे, क्रीडाधिकारी डॉ.रेखा परदेशी, क्रीडाधिकारी आरती चिल्लारे, विजय गाडेकर, रमेश थोरवे ,उपमुख्याध्यापक दंडे, राहुल गायके यांची प्रमुख उपस्थिती होती.सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यास क्रीडा शिक्षक हेमंत जोशी,किशोर नावकर, रमाकांत कुलकर्णी यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सवडे यांनी केले.
जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे दुपारच्या सत्रात “ राज्य़ क्रीडा दिनानिमित्त़ फुटबॉल स्पर्धा, तलवार बाजी स्पर्धा, टेनिक्वाईट स्पर्धा, लोन-टेनिस स्पर्धा ओपन गट व रस्सीखेच स्पर्धा आयोजित करण्यात आले या स्प़र्धेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षा उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे , सुशिल तौर , राम पाटील देठे, गोविंद पाटील ढवळे, ईस्माईल शेख, अमोल काटकर, गणेश पैंजणे ,रोहण वाघमारे, पवन दांडगे आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय तालिम संघ, जालना ,भारत शारीरिक शिक्षण महाविद्यालय, जालना येथे सायंकाळी राज्य क्रीडा दिना निमित्त कुस्तीच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या प्रसंगी डॉ. दयानंद भक्त़, डॉ. शाम काबुलीवाल, चरण सले,डॉ.रेखा परदेशी, आरती चिल्ल़ारे ,राहूल गायके, प्रदीप गायकवाड, डॉ. विनय आस्कंद, बी.यु शिंदे, हेमंत दायमाजी आदी उपस्थित होते.यावेळी विजयी पहिलवानांना पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.