pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

ट्रॅक्टर विहिरीत पडला चालकाचा मृत्यू; 5 तासांनी मृतदेह बाहेर काढण्यात यश,

0 4 1 3 3 6
[sp_wpcarousel id="1375"]

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि 29

शेतात सोयाबीनची पेरणी करत असताना ट्रॅक्टर अचानक विहिरीत पडला. या दुर्दैवी घटनेत ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला. ही घटना आज, शनिवार, १८ जून रोजी सकाळी ९ वाजताचे सुमारास घडली. या घटनेमुळे तिवसा तालुक्यातील वऱ्हा शेत शिवारात शोककळा पसरली. दरम्यान पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टर व मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला.मृत झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव संजय देविदास भाकरे वय ४३, रा. व-हा असे आहे. घटनास्थळ तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलिसांच्या हद्दीत आहे. कुऱ्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गावातील वाघाडे यांच्या शेतात आज शनिवारी सोयाबीनची पेरणी सुरू होती. संजय भाकरे हे आपल्या स्वमालकीच्या मिनी ट्रॅक्टरने शेतात पेरणीसाठी गेले होते. अनवधानाने ट्रॅक्टर शेतात जमिनीशी समांतर असलेल्या ३० ते ३५ फूट खोल विहिरीत जाऊन पडला. या घटनेत चालक संजय भाकरे हे विहिरीतील पाण्यात ट्रॅक्टर खाली दबले त्यामुळे त्यांना बाहेर निघता आले नाही. पाण्यामुळे त्यांचा जीव गुदमरून जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी विहिरीकडे सैरावैरा धाव घेतली. काही नागरिकांनी विहिरीत उतरून भाकरे यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पाण्याची पातळी जास्त असल्याने ते हतबल झाले. शेवटी विहिरीतील १५ फूट पाण्याचा उपसा करुन ५ तासाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले. क्रेनच्या सहाय्याने विहिरीतील ट्रॅक्टर बाहेर काढावा लागला. कु-हा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून आकस्मिक मृत्युची नोंद घेतली आहे. घटनास्थळी कुऱ्हा पोलिस, तिवसा नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाची यंत्रणा उपस्थित होती. गावकऱ्यांनीदेखील घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 3 3 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे