pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

केंद्रीय सैनिक बोर्डाच्या पंतप्रधान शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत

0 1 7 4 0 8

जालना/प्रतिनिधी,दि.7

जालना जिल्ह्यातील माजी सैनिक, सैनिक विधवा, अवलंबितांनी शैक्षणिक वर्ष 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती मिळण्यासाठीची प्रकरणे www.ksb.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रक्रीयेद्वारे सादर करणेची कार्यवाही सुरु झाली आहे. इयत्ता बारावी, किंवा पदविका मध्ये ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेल्या व प्रथम किंवा द्वितीय वर्षासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी दिनांक 1 एप्रिल ते 15 नोव्हेंबर या कालावधीत प्रवेश घेतलेला असावा. तरी पात्र व इच्छुक माजी सैनिकाच्या पाल्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी केले आहे.
ऑनलाईन भरलेल्या अर्जाची हार्डकॉपी व उर्वरित कागदपत्रांची छांयाकीत प्रत काढुन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे सादर करावी. ऑनलाईन फॉर्म भरण्याची कार्यवाही सुरु असुन शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 अशी आहे. सुधारित जोडपत्र 1, 2 व 3 (2023-2024) आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची सविस्तर माहिती के.एस.बी. च्या संकेतस्थळावर (www.ksb.gov.in) उपलब्ध आहे. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात संपर्क करावा. अभ्यासक्रमाची यादी ऑनलाईन पहावी. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे