प्राचार्य अरुण घाग यांचा सेवापूत्ती सन्मान सोहळा उत्साहात संपन्न.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.24
रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनिअर कॉलेज दहागाव विभाग, जासई. ता. उरण जि. रायगड या शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य आणि रयत शिक्षण संस्थेचे लाइफ वर्कर अरुण घाग यांचा सेवापुर्ती सन्मान सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला.शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष आणि भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दशरथ भगत , सुधीर घरत, जे.एन. पी.ए.चे असिस्टंट मॅनेजर यशवंत पाटील,लाईफ मेंबर चंद्रकांत जाधव,तसेच रायगड विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी विलासराव जगताप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन अरुणशेठ जगे हे होते.३२ वर्षाच्या आपल्या प्रदीर्घ सेवेत प्राचार्य अरुण घाग यांनी आदर्श शिक्षक, प्राचार्य म्हणून उत्तम प्रशासक असा नावलौकिक प्राप्त केला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे, डोळखांब, पिरकोन, करंजा,गव्हाण इत्यादी शाखांमध्ये त्यांनी शिक्षक पर्यवेक्षक आणि प्राचार्य म्हणून काम पाहिले आहे. या जासई विद्यालयात प्राचार्य म्हणून त्यांच्या कारकीर्दीत मागील चार वर्षात त्यांनी विद्यालयाची, भौतिक, शैक्षणिक व गुणवत्तेमध्ये भरीव प्रगती केली. या विद्यालयास रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर पारितोषिक, महाराष्ट्र शासनाचा स्वच्छ शाळा -सुंदर शाळा तालुक्यात प्रथम क्रमांक पुरस्कार, उपक्रमशील शाळा पुरस्कार व उपक्रमशील विज्ञान शिक्षिका पुरस्कार, रायगड विभागाय आदर्श विद्यार्थी पुरस्कार असे अनेक पुरस्कार विद्यालयास आपल्या सहकाऱ्यांच्या सोबतीने प्राप्त करून दिले. त्याचबरोबर विद्यालयाच्या निकाल परंपरेत वाढ करून शाळेस नावलौकिक प्राप्त करून दिला. त्यांच्यातील शैक्षणिक तळमळ आणि कार्य कुशल प्रशासक या गुणांची कदर करून रयत शिक्षण संस्थेने त्यांना लाइफ वर्कर व संस्थेच्या अनेक कमिट्यांवर काम करण्याची संधी दिली. त्यांच्या या प्रदीर्घ कौतुकास्पद शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना रायगड जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार ,डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन अवार्ड, ग्लोबल टीचर रोल मॉडेल अवार्ड – नवी दिल्ली, शिक्षक रत्न सन्मान- मुंबई ,उत्कृष्ट रयत सेवक पुरस्कार आणि मुख्याध्यापक म्हणून महाराष्ट्र – गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांमधून दिला जाणारा राष्ट्रीय पातळीवरील आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार बेळगाव येथे देऊन सन्मानित केले आहे.
त्यांच्या या सेवाभावी आणि उत्कृष्ट सेवेबद्दल सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतात त्यांचे कौतुक करून त्यांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास रयत सेवक संघाचे सचिव अनिल खरात,विजय चव्हाण ,विद्यालयाचे व्हा.चेअरमन डी आर. ठाकूर ,रयत को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक किशोर पाटील, रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक नुरा शेख, रघुनाथ ठाकूर ,प्राचार्य व साहित्यिक ए.डी. पाटील, विविध शाखेतील शाखाप्रमुख व शिक्षक,स्कूल कमिटी सदस्य, सल्लागार समिती सदस्य, सर्व सेवक,शिक्षण प्रेमी नागरिक, विद्यार्थी आणि मित्रपरिवार व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरेश पाटील, प्रा. अतुल पाटील,घरत पी.जे. यांनी केले. तर आभार प्रदर्शन गुरुकुल प्रमुख ठाकरे एस. पी.यांनी केले.