pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सौर ऊर्जा प्रकल्पास मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू – आ. कैलास गोरंटयाल

15 मेगावॉट वीजनिर्मिती होणार  जालना मनपाची वर्षाला होईल 50 कोटींची बचत

0 1 7 4 1 5
जालना/प्रतिनीधी,दि.12
अमृत अभियाना अंतर्गत 15 मेगावॉट वीजनिर्मिती होईल इतक्या क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला असून त्यास मंजुरी मिळावी यासाठी आपण राज्य शासनाकडे पाठपुरावा करत आहोत.हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास जालना महापालिकेची वर्षाकाठी वीज देयकावर होत असलेल्या किमान 50 कोटी रुपयांची बचत होईल असा विश्वास व्यक्त करून याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न कुणी करू नये असा टोला आ.कैलास गोरंटयाल यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना लगावला आहे.
जालना नगर पालिका अस्तित्वात असतांना जालना विधानसभा मतदार संघातील घानेवाडी येथील राष्ट्रसंत गाडगे बाबा जलाशय परिसरात अमृत अभियान अंतर्गत 15 मेगावॉट वीजनिर्मिती होईल इतक्या क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव आपल्या सुचनेनुसार जालना नगर पालिकेने तयार केला आहे.सुमारे 90 ते 100 कोटी रुपये खर्चाचा हा सौर ऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव मागील सहा महिन्यांपूर्वी राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून सदर प्रस्तावास मंजुरी मिळावी यासाठी आपण राज्य शासनाकडे पाठपुरावा करत आहोत.जालना शहरातील जनतेला दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी जालना नगर पालिकेला विजेवर वर्षाकाठी सुमारे 30 ते 35 कोटी रुपयांचा खर्च करावा लागत आहे.तसेच संपूर्ण जालना शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी जालना शहरानजीक मंठा रोडवर प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे.या सांडपाणी प्रकल्पाचे काम देखील सध्या प्रगती पाठवत असून येत्या चार महिन्यात सदर काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आ.कैलास गोरंटयाल यांनी व्यक्त केली आहे.हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी लागणार्‍या विजेवर देखील वर्षाला किमान 8 ते 10 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. एकूणच जालना शहरातील जनतेला दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी लागणार्‍या विजेवर आणि सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी लागणार्‍या विजेवर जालना महापालिकेला वर्षाला करावा लागणारा किमान 50 कोटी रुपयांच्या खर्चाची बचत सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीमुळे होणार असल्यामुळे अमृत अभियान अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाला तातडीने मंजुरी मिळावी यासाठी आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजितदादा पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत असून त्यांनी देखील मंजुरी देण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने सदर प्रस्ताव लवकरच मार्गी लागेल असा विश्वास आ.कैलास गोरंटयाल यांनी व्यक्त केला आहे.
—-–————————————बचत होणार्‍या निधीतून विकासाला चालना मिळेल
अमृत अभियान अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेला सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास  शहरातील जनतेला दररोज पाणी पुरवठा करण्याबरोबरच प्रगती पथावर असलेल्या सांडपाणी प्रकल्प या दोन्ही बाबींसाठी  आवश्यक असलेल्या विजेसाठी अदा कराव्या लागणार्‍या देयकापोटी जालना महापालिकेची वर्षाला किमान 50 कोटी रुपयांची बचत होणार असून सदर निधी शहरातील विविध भागातील विकास कामांवर खर्च करण्यासाठी जालना महानगर पालिकेला मोठी मदत होईल असे सांगून घानेवाडी येथे प्रस्तावित असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पास तातडीने मंजुरी मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आ.कैलास गोरंटयाल यांनी स्पष्ट केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे