pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

महासंस्कृती महोत्सवात 17 फेब्रुवारीला होणार राष्ट्रभक्तीपर गीते, भिमगिते, शिवगीते व नृत्याचा जोशपूर्ण कार्यक्रम

अलका कुबल, साधना सरगम, प्रा.राजेश सरकटे, वैशाली माडे हे राहणार उपस्थित भारुडकार, शाहीर सादर करणार लोकरंग कार्यक्रम सर्वांना विनामुल्य प्रवेश

0 1 7 4 1 5

जालना/प्रतिनिधी, दि.16

महासंस्कृती महोत्सवाअंतर्गत जेईएस महाविद्यालयाच्या प्रांगणात दि.17 फेब्रुवारी 2024 रोजी वंदे मातरम या राष्ट्रभक्तीपर गीते, भिमगीते, शिवगीतांचा व नृत्यांचा जोशपूर्ण कार्यक्रमाने महासंस्कृती महोत्सवाचा समारोप होणार आहे.  या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण प्रसिद्ध सिनेअभिनेत्री अलका कुबल तसेच सुप्रसिध्द पार्श्वगायिका साधना सरगम, सुप्रसिध्द गायक वैशाली माडे, प्रा. राजेश सरकटे  व संच, गायक रवींद्र खोमणे, मुनव्वर अली आणि सुप्रसिध्द कोरिओग्राफर संतोष भांगरे  हे राहणार आहेत.
शनिवार   दि. 17 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी  5  वाजता सुरु होणाऱ्या महोत्सवाच्या प्रारंभी  जालना लोकरंग कार्यक्रम सादर होणार आहे. यामध्ये प्रसिध्द भारुडकार मीरा उमप व संच, संतोष वाघ आणि संच, गजानन लेखणार आणि संच, शाहिर विजय मघाडे, शाहीर अप्पासाहेब उगले, शाहिर नानाभाऊ परिहार व संच, शाहीर मिर कावळे, शाहीर विजय काटे, शाहीर बाबु सेवा राठोड व संच यांचा भारुड व शाहीरीचा कार्यक्रम होईल. त्यानंतर सायंकाळी  6:30  वा. समारोप कार्यक्रमातंर्गत वंदे मातरम हा राष्ट्रभक्तीपर गीते, भिमगीतांचा, शिवगीतांचा व नृत्यांचा जोशपूर्ण कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य आहे. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे