pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

श्री स्वामी पुण्यतिथी निमित्त आयोजित अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताहाची परिसर स्वच्छता, महानैव्यद्य आरती व महाप्रसादाने सांगता

0 1 1 8 3 4

छ.संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.18

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ-त्र्यंबकेश्वर अंतर्गत बजाजनगर येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री स्वामी पुण्यतिथी निमित्त सुरू असलेल्या अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताहाची सांगता दिनांक १८ एप्रिल २०२३ रोजी महानैव्यद्य आरती ने करण्यात आली. या वेळी तब्बल १३६०० भाविक सेवेकऱ्यांनी आरती व महाप्रसादाचा लाभ घेतला. दिवसभर कडक उन्हात श्री स्वामी समर्थ केंद्राच्या दिशेने भाविक सेवेकऱ्यांचा ओघ चालूच होता. बजाजनगर येथील सर्व रस्ते भाविक सेवेकऱ्यांच्या गर्दीने गजबजले होते.महानैवेद्य आरतीनंतर प. पू. गुरूमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या राष्ट्रकल्याण व राष्ट्रसंरक्षण साठी ग्रामअभियान चळवळ याविषयी मौलिक मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामअभियान अंतर्गत सेवा मार्गाच्या आठरा विभागाच्या कार्य पध्दतीची ओळख मार्गदर्शनाच्या माध्यमातून करण्यात आली. प. पू. गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या अध्यात्मातून राष्ट्र हित साधण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रम सेवा मार्गाच्या माध्यमातून होत असतात. याची ओळख उपस्थित भाविक सेवेकऱ्यांना मार्गदर्शनाच्या माध्यमातून करण्यात आली.
सेवा मार्गाच्या २०% अध्यात्म आणि ८०% समाजकार्य या उक्तीला प्रेरीत होऊन विविध सामाजिक उपक्रम सेवा केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात आले. यामध्ये बजाजनगर सेवा केंद्र ते शिव स्मारक परिसर स्वच्छता अभियान सर्व सेवेकऱ्यांनी मिळुन राबवले. या उपक्रमात १३२७ महिला, पुरुष व बालसेवेकऱ्यांनी सहभाग घेतला. तसेच अयोजीत रक्तदान शिबिरात ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सोबतच ३५० सेवेकऱ्यांनी मोफत आरोग्य शिबीराचा लाभ घेऊन १४८ बालकांना मोफत सुवर्णप्राशन देण्यात आले. सेवा केंद्रात मोफत नेत्र तपासणी शिबीराचे देखील आयोजन करण्यात आले होते. २१७ गरजूंनी मोफत नेत्र तपासणी शिबीराचा लाभ घेतला.
सप्ताह काळात झालेल्या सामुदायिक सेवेचा अहवाल सादर करून झालेली सर्व सेवा भाविक सेवेकऱ्यांनी श्री स्वामी समर्थ महाराज आणि प. पू. गुरुमाऊलींच्या चरणी अर्पण केली.

4/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 3 4