pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त 31 मे रोजी सायकल मॅरेथॉन व प्रभातफेरीचे आयोजन

0 1 2 1 1 1

जालना/प्रतिनिधी,दि. 30

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरामध्ये विविध स्तरावर तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थ सेवनाने दुष्परिणामाविषयी जनजागृती करण्यासाठी व कोटपा-2003 कायद्याची अंमलबजावणी विविध विभागासोबत करण्यासाठी  राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो.
राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत सामान्य रुग्णालय जालनाच्यावतीने दि. 1 ते 31 मे 2023 या कालावधीत जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या संकल्पनेतून जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या अनुषंगाने सायकल मॅरेथॉन व प्रभातफेरीचे दि. 31 मे 2023 रोजी सकाळी 7 वाजता आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व अधिकारी-कर्मचारी, डॉक्टर्ससह नागरिकांनी मोठ्या संख्येने सायकल मॅरेथॉन व प्रभात फेरीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक, जालना यांनी केले आहे.
सायकल मॅरेथॉन जिल्हा परिषद जालना येथून सुरुवात होवून रेल्वेस्टेशन, गांधी चमन, शनी मंदिर मार्गे मुक्तेश्वरद्वार, सामान्य रुग्णालय ते जिल्हा परिषद तर प्रभातफेरी जिल्हा परिषद,अंबड चौफुली  मार्गे जिल्हा रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, समाज कल्याण  मार्गे जिल्हा परिषदेत येवून समारोप होईल. सर्वांनी स्वत:ची सायकल घेवून उपस्थित रहावे, असे जिल्हा शल्यचिकित्सक, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 1 1