pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

बुधवारी प्लेसमेंट ड्राईव्ह-जागेवर निवड संधीचे आयोजन; जिल्ह्यातील उमेदवारांनी रोजगाराच्या पर्वणीचा लाभ घ्यावा

0 1 7 4 1 2

जालना/प्रतिनिधी,दि.9

नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांच्याकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरु करण्यात आली आहे. याप्रमाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जालना यांच्यामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सांस्कृतिक सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथे बुधवार दि. 14 जून, 2023 रोजी सकाळी 10.30 ते दु. 2 वाजेपर्यंत प्लेसमेंट ड्राईव्ह-जागेवर निवड संधीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी उपस्थित राहून या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त संपत चाटे यांनी केले आहे.
महिको प्रायव्हेट लिमिटेड जालना यांची ट्रेनी पदाची शिक्षण पदवी (बी. एस्सी. अॅग्रिकल्चर) 02 पदे, आणि पदव्युत्तर पदवी (एम. एस्सी. अॅग्रिकल्चर) 2 पदे, नव- भारत फर्टिलायझर्स लिमिटेड औरंगाबाद यांची शिक्षण दहावी/बारावी/पदवीधरासाठी सेल्स रिप्रेजेंटेटिव्ह पदाची 20 पदे, शिक्षण एम.बी.ए./ एम.एस.डब्ल्यू /एच.आर मॅनेजर एच.आर. मॅनेजरसाठी 1 पद, पिपल ट्री व्हेंचर्स प्रा. लि. औरंगाबाद यांच्याकडे बारावी पास उमेदवारासाठी मशिन ऑपरेटर पदासाठी 50 पदे व टॅलेनसेतु सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड पुणे येथे दहावी/बारावी/ पदवीधर असलेल्या उमेदवारांसाठी असेंबली लाइन ऑपरेटर पदाची 20 पदे अशी एकुण 95 रिक्त पदे प्राप्त झाली आहेत. नोकरी इच्छुक उपस्थित होणाऱ्या पात्र उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवड करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होम पेजवरील नोकरी साधक (जॉब सीकर) लॉगिनमधून आपल्या युजर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगिन करावे. त्यानंतर डॅशबोर्ड मधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करुन जालना जिल्हा निवडून त्यातील स्पेशल जॉब फेयर-3 जालना याची निवड करावी. उद्योजक / नियोक्तानिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी. याप्रमाणे आवश्यक किमान पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून उपलब्ध असलेल्या रिक्त पदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंती क्रमांक नोंदवावा आणि किमान पाच प्रतीत बायोडाटासह फोटो आणि आधारकार्ड, सेवायोजन नोंदणी कार्ड, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, इत्यादी कागदपत्रे कंपनींना देण्यासाठी छायाप्रती संच सोबत ठेवून बुधवार दि.14 जून 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता प्रत्यक्ष मुलाखतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सांस्कृतिक सभागृह जिल्हाधिकारी कार्यालया समोर, जालना येथे उपस्थित राहून या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे. असे क. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे