pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जेएनपीव्ही आर के एफ प्रशासना विरोधात पालकांचे गेट बंद आंदोलन.

मागण्या मान्य झाल्याने पालकांचे गेट बंद आंदोलन स्थगित.माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मध्यस्थीने सर्व प्रश्न मार्गी.

0 1 7 3 9 9

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.4

उरण तालुक्यातील जे एनपीए वसाहत मध्ये कार्यरत असलेल्या आर.के. एफ- जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय शेवा या संस्थेच्या मनमानी व एकतर्फी कारभाराविरोधात लोकशाही व कायदेशीर मार्गाने वरिष्ठ पातळीवर व संबधित विभागांना पत्र व्यवहार करून देखिल विद्यार्थी व पालकांच्या समस्या सूटत नव्हत्या. शिक्षक, पालक विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. आर.के एफ शिक्षण संस्थेच्या निष्क्रीय व मनमानी कारभाराचा निषेध करण्यासाठी व शिक्षक, पालक, विदयार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पालक संघर्ष समितीतर्फे मंगळवार दि 4 जुलै 2023 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून आर के एफ जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय शेवा (जेएनपीए )च्या गेटसमोर शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांनी गेट बंद आंदोलन केले.

आर के एफ प्रशासनाच्या प्रशासकीय अधिकारी श्रीमती पूजा अंजनीकर यांचे त्वरीत निलंबन करावे. 3 वर्षापासून ज्या शाळेत इमारतीमध्ये जे वर्ग भरत होते तेच पूर्ववत करावे.इयत्ता 8 वी ते 10 वी मराठी माध्यमिक विदयार्थ्यांना शासनाकडून आलेला अनुदान शाळेने घ्यावा व पालकांच्या मुलांची फी पूर्णपणे माफ करावी.शिक्षकांना शासनाच्या नियमाप्रमाणे पूर्ण वेतन मिळावे. अशा विविध मागण्यासाठी पालक संघर्ष समिती च्या माध्यमातून पालक संघर्ष समितीचे अध्यक्ष किरण घरत व शिक्षक नेते नरसु पाटील यांच्या नेतृत्वाखाली आर.के.एफ
शाळेसमोरा गेट बंद आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनाची दखल घेत,आरके एफ प्रशासनाने त्वरित पालकांना चर्चेसाठी शाळेत बोलाविले.विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी,पालक, शिक्षक व आरकेएफ प्रशासन यांच्यात बैठक झाली. बैठकीत माजी आमदार मनोहरशेठ भोईर,जेएनपीएचे विश्वस्त दिनेश पाटील ,शिक्षक नेते तथा उद्योजक नरसु पाटील,ज्येष्ठ साहित्यिक एल. बी. पाटील, उरण विधानसभा संपर्क प्रमुख महादेव घरत, महिला अध्यक्ष रेखा घरत, ॲडवोकेट रत्नदिप पाटील,तुषार घरत, किरीट पाटील , कामगार नेते सुरेश पाटील, कामगार नेते रवि घरत रमाकांत म्हात्रे, मुख्याध्यापक रमाकांत गावंड, मुख्याध्यापक गिरीश पाटील, मुख्याध्यापक प्रमोद कांबळे आदी मान्यवर तसेच पालक संघर्ष समितीचे अध्यक्ष किरण घरत,उपाध्यक्ष अमर म्हात्रे, उपाध्यक्ष रेखा ठाकूर, कार्याध्यक्ष योगेश तांडेल, पालक सदस्य -विश्वास पाटील, अजय खाडे, लिलेश्वर ठाकूर, अविनाश म्हात्रे, रंजना म्हात्रे, प्रियदर्शनी म्हात्रे, पल्लवी जोशी, जागृती ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांच्या मागणीबाबत सविस्तर चर्चा झाली, जे.एन. पी.एचे विश्वस्त दिनेश पाटील यांनी पूजा अंजनीकरची त्वरीत उचलबांगडी करावी, त्यांचे निलंबन करावे अशी मागणी केली. शिक्षक नेते नरसु पाटील यांनी शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्राचे बाझार करू नका. शिक्षण क्षेत्रातील पावित्र्य जपा. शिक्षक, पालक विद्यार्थ्यांना न्याय दया. अशी भूमिका घेतली.तर जेष्ठ साहित्यिक तथा रायगड भूषण एल. बी. पाटील यांनी शाळेचा दर्जा घसरू देऊ नका.शाळेत बीयरची जाहिरात करणा-या पूजा अंजनीकर यांच्यावर कारवाई करा. तीन तीन महिने शिक्षकांना पगारावाचून वंचित ठेवले तसे करू नका.शिक्षकांना वेळेवर पगार दया.असे सुचविले. तर महादेव घरत यांनी शिक्षक पालकांच्या मागण्या, सूचना प्रशासनाने विचारात घ्या. शाळेला पूर्वीची शिस्त लावा.अशी मागणी केली तर रेखा घरत यांनी महिलांवर कोणताही अन्याय होणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी अशी मागणी केली. स्थानिक भूमीपुत्रांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय खपवून घेणार नाही असा आक्रमक पवित्रा यावेळी माजी आमदार मनोहर भोईर यांनी बैठकीला दरम्यान घेतला. उपस्थित सर्व मान्यवर व पालक संघर्ष समितीने घेतलेल्या आक्रमक भूमिकेसमोर नमते घेत आरकेएफ जवाहरलाल पोर्ट विद्यालय शेवा प्रशासनाने पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. पालकांच्या शिक्षकांच्या मागण्या मान्य झाल्याने गेट बंद आंदोलन स्थगित करण्यात आले.पालकांनी, शिक्षकांनी गेट बंद आंदोलनास प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पाठिंबा दिलेल्या सर्व मान्यवरांचे व मागण्या मान्य होण्यासाठी प्रयत्न करणा-या सर्वांचे आभार मानले. आर के एफ जवारहलाल पोर्ट विद्यालय शेवा या विद्यालयात अनेक चुकीच्या व बकायदेशीर गोष्टी सुरु होत्या. आता सर्वच मागण्या मान्य झाल्याने आरकेएफ जवाहरलाल पोर्ट विद्यालय शेवा या विदयालयातील चूकीच्या व बेकायदेशीर गोष्टींना आळा बसणार असल्याने शिक्षक, पालक, विदयार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 3 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे