pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

माजी आमदार,शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या दातृत्वाचा आणखीन एक प्रत्यय …

अपघात झालेल्या गरीब कुटुंबातील उमेश दुर्गे याला केली आर्थिक मदत

0 1 2 1 1 1

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.8

रायगड जिल्हा शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्य सर्वानाच माहीत आहे.त्याचा आणखीन एक प्रत्यय आज पहायला मिळाला. उरण विधानसभा मतदार संघातील खालापूर तालुक्यातील धारणी येथील उमेश दुर्गे या गरीब तरुणाचा हुंडाई मुव्हीज कंपनी रसायनी येथे अपघात झाला होता. अतिशय गरीब परिस्थिती असल्यामुळे त्याच्या परिवाराला खूप मोठा मानसिक धक्का बसला होता. मेडिकल ट्रीटमेंट साठी पैशाची व्यवस्था होत नव्हती, अशा वेळी गरीब व गरजूंच्या मदतीला नेहमीच धावून येणारे शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी त्यांच्या कुटुंबियांना धीर देऊन त्यांना पंचवीस हजार रुपये मदत करत त्यांच्या मेडिकल ट्रीटमेंट साठी मोलाचे सहकार्य केले आहे. सदर अर्थिक मदत ही शनिवार दिनांक 08 जुलै 2023 रोजी त्याच्या राहत्या घरी जाऊन स्वतः माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी उमेश दुर्गे यांच्या हाती सुपूर्द केली.यावेळी जिल्हा परिषद सदस्य मोतीरामशेठ ठोंबरे, खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, जेष्ठ कार्यकर्ते उत्तमशेठ भोईर,उपसरपंच हरीश दुर्गे, अनंत पाटील, गजानन ठाकूर, भगवान जाधव, संतोष जाधव, कालूराम दुर्गे, नंदू दुर्गे, अरविंद बडेकर, व ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 1 1