मंगळवारी वंचित बहुजन आघाडीची जालना जिल्हा पुर्व आणि पश्चिम संयुक्तिक महत्त्वाची बैठक…….

जालना/जितेंद्र गाडेकर,दि.25
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून व वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा मा.रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार आणि वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा निरीक्षक जितेंद्र शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली व जालना जिल्हा अध्यक्ष डेव्हिड घुमारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि पुर्व जालनाजिल्हा कार्याध्यक्ष परमेश्वर खरात,जिल्हा उपाध्यक्ष अकबर इनामदार यांच्या उपस्थितीत
महाराष्ट्रातील नांदेड,बीड,मुंबई येथील हत्या प्रकरण तसेच परळी शहरातील मुस्लिम व्यक्तीचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला या संदर्भात जालना या ठिकाणी भव्य मोर्चा काढण्यासंदर्भात व मुंबई येथे होणारा २० जुलै च्या मोर्चा विषयी नियोजन करण्यासाठी
दिनांक 27/6/2023 मंगळवार रोजी दुपारी 2 वाजता वंचित बहुजन आघाडी शासकीय विश्रामगृह अंबड चौफुली जालना येथे जालना जिल्हा पुर्व आणि पश्चिम संयुक्तिक बैठक आयोजित करण्यात आली आहे.
तरी जालना जिल्ह्यातील सर्व पूर्व आणि पश्चिम जिल्हा, तालुका, शहर,सर्कल, महिला,पुरूष पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या महत्त्वाच्या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आहवान जालना जिल्हा महासचिव प्रा संतोष आढाव यांनी केले आहे.