pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अंबाळा येथील अनाथ दिपालीच्या विवाहासाठी साईप्रसाद परीवाराची सामाजिक बांधीलकी संसार उपयोगी साहित्य अन्नदान साहित्य मदत

0 1 7 4 0 8

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.29

अंबाळा ता.हदगांव येथील दिपाली टोकलवाड ची आई नंदाताई पतीपासुन अलिप्त आपल्या आई च्या मदतीने दोन मुले एक मुलगी घेऊन गेल्या पंचेविस वर्षांपासून माहेरी अंबाळा येथे राहते. आजुबाजुच्या जिल्ह्यात सर्व परीचीत असलेल्या तीर्थक्षेत्र मानवाडी येथील मंदिर परिसरात बेलफुल विकुन उदरनिर्वाह चालवत असताना वर्षापुर्वीच आईचेही निधन झाले.अनाथ झालेल्या दिपालीचा विवाह पळसा ता.हदगांव येथील मुलाशी जुळला. तिन एप्रील रोजी मामाच्याच घरी विवाह सपन्न होणार असून विवाह तोंडावर असताना साहित्य खरेदी करण्याची अडचणीची माहिती साईप्रसाद परीवाराला कळविण्यात आली. साईप्रसाद परीवाराचा नुकताच विवाह सोहळा संपन्न झाला असल्याने दुसर्‍या मेळाव्याला वेळ होता.पण साईप्रसाद परीवाराकडुन अद्याप कोणीही रिकाम्या हाताने परत गेला नाही हे विशेष आहे. त्यांनी खात्री करून अनाथ दिपालीच्या विवाहाला लागणारे सर्व संसार उपयोगी साहित्य अन्नदान साहित्य कपडे शिलाईसह विवाहाच्या अगोदर आठ दिवस अगोदर नेहमी प्रमाणे कोणताही चेहरा समोर न येता घरपोच कन्यादान अन्नदान साहित्य देत सामाजिक बांधीलकी जोपासली. साहित्य बघुन दिपालीसह आजी भाऊ यांच्या आंनदाला पारावार उरला नव्हता. यावेळी साहित्य बघण्यासाठी खूप गर्दी झाली होती. साईप्रसाद परीवाराचे साहित्य बघुन अनाथ दिपालीच्या विवाहासाठी गावक-यासह नातेवाईक सरसावले आहेत. यावेळी रयत प्रतिष्ठान अध्यक्ष सटवा पवार जवळगावकर सामाजिक कार्यकर्ते राजु पांडे हदगांवकर निवृतीराव वानखेडे मानवाडीकर सवीता निमडगे पळसेकर बंडु माटाळकर रामेश्वर बोरकर निवघाबाजार,प्रभाकर दहिभाते बालाजीराव वानखेडे माधवराव पवार यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक युवक महिला मंडळी उपस्थित होते.

प्रत्येक मुलीला आपल्या विवाहात साहित्य असावे वाटते.पण आईवडील नसल्याने किंवा आर्थिक परीस्थीती मुळे शक्य नसते. अश्या परिस्थितीत साईप्रसाद परीवाराने चेहरा समोर न येता तालुक्यातील अनाथ गरजु कुटुंबातील शंभर हुन अधिक मुलीला कन्यादान साहित्य घरपोच देत देवरुपी मदतीला धावुन आले. साईप्रसाद परीवार नांदेड सह आजुबाजुच्या जिल्ह्यात निस्वार्थ मदतीने ईश्वर ठरला आहे.
सविता निमडगे पळसेकर सामाजिक कार्यकर्त्या

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे