श्रीमती.जे.बी.के विद्यालयाच्या “सोहम पवार”ची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.8
टेंभुर्णी शहरातील नामांकित नवभारत शिक्षण संस्थेच्या श्रीमती.जे.बी.के विद्यालय व नवभारत उच्च माध्यमिक विद्यालयात इ.१०वीत शिक्षण घेत असलेल्या सोहम शांताराम पवार याने छत्रपती संभाजी नगर युवक व क्रीडा संचालय पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजी नगर यांच्या वतीने आयोजित व नुकत्याच पार पडलेल्या विभागीय स्तरावरील वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत “प्रथम क्रमांक” पटकावला असुन, राज्य स्तरावरील होणार्या “वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी” निवड झाली आहे, त्याच्या या यशस्वी चमकदार कामगिरी बद्दल नवभारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष. संजय काबरा, उपाध्यक्ष. जमिर शेख सर, सचिव. सत्यनारायण सोनी, जेष्ठ संचालक. मधुकर निकम, संचालक. सुभाष राठी, विश्वनाथ सांगुळे, संचालक प्रा. दत्ताजीराव देशमुख, ॲड.प्रेमसुख काबरा, प्रदिप काबरा, प्राचार्य. व्हि.के.जाधव, एस.बी.बोरकर, आदींनी अभिनंदन केले आहे.क्रीडा विभाग प्रमुख कैलास भुतेकर,क्रीडा मार्गदर्शक राजेश शेवाळे, पालक शांताराम पवार यांचे सोहम पवार ला मार्गदर्शन लाभले,सर्व शिक्षक,प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी बंधु भगिनी आदींनी सोहम चे अभिनंदन केले आहे, तसेच १० नोव्हें २०२५रोजी मनमाड येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

