आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन व रंगीत तालीम कार्यक्रमाचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि. 9
महसूल विभागामार्फत 1 ऑगस्ट या महसूल दिनापासून महसूल पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व विभाग प्रमुख अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन व रंगीत तालीम कार्यक्रमाचे सोमवार दि.12 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात करण्यात आले आहे.
आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यक्रमात प्राथमिक आगीपासून बचाव करण्याबाबत मार्गदर्शन महापालिकेचे अग्नीशमन अधिकारी माधव पानपट्टे करणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आगीपासून सुरक्षीततेसाठी रंगीत तालीम आणि आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव साहित्याचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. तरी आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन व रंगीत तालीम कार्यक्रमास अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याबाबत परिपत्रकान्वये कळविले आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.