71 मोबाईल, लॅपटॉप असा एकुण 11,30,000/- रूपयांचा मुद्देमाल नागरिकांना मिळाला परत …
मोबाईल फोन अगर कोणतीही वस्तु चोरी झाल्यास नजिकच्या पोलीस ठाण्यास तक्रार द्यावी मा.पोलीस अधीक्षक यांचे नागरिकांना आवाहन

छ.संभाजीनगर/कृष्णा घोडके,दि.14
दि. १३ छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यात अंतर्गत नागरिकांचे हरविलेले/गहाळ मोबाईल फोन, एक लॅपटॉप व गुन्हयात चोरी गेलेले 04 मोबाईल व एकुण 11,30,000 /- रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात जिल्हा पोलासांना यश मिळाले आहे. हा हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल यातील फिर्यादीना तातडीने मिळावा याकरिता मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, व मा. सुनिल लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक यांनी संपुर्ण कायदेशिर प्रक्रिया जलद गतीने पार पाडण्याचे सुचना सर्व प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या.
या अनुषंगाने दिनांक 12/04/2023 रोजी सकाळी 04:00 वाजेला मा. मनीष कलवानिया, पोलीस अधीक्षक, यांचे हस्ते गोळुळ मैदान, पोलीस मुख्यालय, येथे आयोजित कार्यक्रमात नागरिकांना त्यांचे मोबाईल फोन व लॅपटॉप असे साहित्ये परत देण्यात आली आहेत.
यामध्ये पोलीस ठाणे 1) चिकलठाणा, (20 मोबाईल) 2) एम. पैठण (16 मोबाईल) 3) पैठण (6 मोबाईल) 4) कन्नड ग्रामीण (04 मोबाईल) 5) कन्नड शहर (03) 6) सिल्लोड शहर ( 11 मोबाईल) 7) सोयगाव (03 मोबाईल) 8) पिशोर (02 मोबाईल) 9) अजिंठा व बिडकीन, खुलताबाद, विरगाव, करमाड, देवगाव रंगारी, (प्रत्येकी 01 एकुण 06) 10) पाचोड ( 02 मोबाईल व 01 लॅपटॉप) यांचे अंतर्गत नागरिकांचे हरविलेल्या मोबाईल फोनचा सातत्याने तांत्रिक विश्लेषणाचे आधारे शोध घेऊन असे एकुण 74 मोबाईल हॅण्डसेट ज्याची अंदाजे कि.अ.11,30,000 रुपये किंमतीचे नागरिकांना परत करण्यात आले आहे.त्याचा हरवलेला मोबाईल परत मिळालेला पाहुन त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
यावेळी मोबाईल मिळालेल्या नागरिकांपैकी त्यांचे प्रतिक्रिया देताना सांगितले ज्यामध्ये 1) दिपक देवराव गायकवाड 2) अफसर गफुर पठाण रा. शेंद्रा 3) आनंद भास्कर देशमुख रा. लासुरगाव 4) स्वप्निल बाळासाहेब माळी रा. कांचनवाडी 5) ज्ञानेश्वर गंगाधर ढेपे रा. मिसारवाडी यांचे मोबाईल हे हॉटेल परिसर, चित्तेगाव बाजार, साईटेकडी परिसर अशा भागात हरवला होता. त्यांनी मोबाईल परत मिळेल ही आशा सोडली होती ब-याच जणांचे मोबाईचे हप्ते सुध्दा बाकी होते जे मोबाईल हरवले नंतर सुध्दा त्यांना भरावे लागत होते.
परत पोलीसांनी त्यांना त्यांचा मोबाईल परत मिळवुन दिला ज्यामुळे पोलीसावरिल त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.मा. पोलीस अधीक्षक यांचे माध्यमांतुन मोबाईल फोन, लॅपटॉप मुळ मालकांना परत मिळाल्याने ते भावनिक होत त्याचे हरविलेले व चोरी झालेले फोन परत मिळतील ही आस सोडलेली असतांना मा. पोलीस अधीक्षक यांनी त्यांना ते मिळवुन दिले अशी भावना व्यक्त केली आहे.
यावेळी मा. पोलीस अधीक्षक यांनी नागरिकांना आवाहन केले आहे कि, त्यांनी मोबाईल फोन अगर कोणतीही वस्तु चोरी झाली अगर हरविली त्याबाबत नजिकच्या पोलीस ठाण्यास तक्रार द्यावी पोलीस त्यांचा शोध घेऊन ती नक्कीच आपणासं परत मिळवुन देतील असे विश्वास दिला आहे.
या कार्यक्रम प्रसंगी मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांचेसह श्री. डॉ. विशाल नेहुल,श्री. जयदत्त भवर,श्री.मुकूंद आघाव, श्री.विजयकुमार मराठे, श्री.प्रकाश बेले, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व प्रभारी अधिकारी यांचेसह 100 ते 150 नागरिक उपस्थित होते.