pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी ही एक प्रेरणा–प्रा.संदीप पाटील

0 4 1 0 0 8
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.20

जाफराबाद येथील सिद्धार्थ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश देशमुख हे होते तर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो.डॉ. सुनील मेढे यांची प्रमुख उपस्थिती होती. एक दुग्ध शर्करा योग म्हणून प्रा.एस.एम. पाटील यांचे वडील मोहनराव पाटील यांचीही विशेष उपस्थिती होती. प्रारंभी महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रा.एस.एम.पाटील यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य, पराक्रम, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचे महत्त्व श्रोत्यांना पटवून दिले. त्यांनी सांगितले की, शिवाजी महाराज हे केवळ योद्धे नव्हते, तर ते आदर्श प्रशासक, न्यायप्रिय राजा आणि स्वराज्याचे संस्थापक होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची मुत्सद्यगिरी या विचारांची प्रेरणा घेऊन रयतेनेही आपल्या जीवनात शिस्त, धैर्य आणि देशभक्ती जोपासली होती, रयत सुखी समाधानी आणि भयमुक्त जीवन जगत होती असे आपल्या भाषणात प्रा.पाटील यांनी श्रोत्यांना सांगितले.
अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्रा.डॉ.रमेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वावर शौर्यावर तसेच त्यांच्या उत्तम प्रशासनावर व स्त्रियांच्या सन्मानाबद्दल सर्वधर्मसमभाव व न्यायप्रिय शासन व्यवस्था असे सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील मूल्यशिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रो.डॉ.संतोष पहारे यांनी केले तर आभार प्रा.डॉ.सुनंदा सोनुने यांनी मानले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रसिद्ध प्रमुख प्रा.अनिल वैद्य, सर्व प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे महाविद्यालयात उत्साहाचे आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 0 0 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे