नऊ ऑगस्ट 2024 रोजी दिव्यांग, वृध्द निराधाराचा एल्गार मोर्चा
जिल्हाधिकारी नांदेड मार्फत मा. मुख्यमंत्री मंत्रीमंडाना निवेदनाद्वारे चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिला इशारा

नांदेड/प्रतिनिधी, दि.22
नांदेड जिल्ह्यातील नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचलकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 22 जुलै 2024 रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांना दिव्यांग संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन अनेक विषयांवर चर्चा करून आपल्या पातळिवरील प्रश्न पाच ऑगस्ट २०२४ पर्यंत निकाली काढा वरीष्ठ पातळीवर असलेल्या प्रश्न त्वरीत मुख्यमंत्री, मंत्रीमहोदय यांना
पाठऊन दिव्यांगाना न्याय हक्क
मिळत नसल्यामुळे दिव्यांग बांधव दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हा परिषद महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर अनेक प्रश्नांसाठी दिव्यांग वृध्द निराधार मोर्च्याचे आयोजन व तिव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी साहेब नांदेड मार्फत अनेक प्रश्नाचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे अर्थमंत्री दिव्यांग मंत्रालय सचिव,दिव्यांग मंत्रालय अध्यक्ष , मुख्यकार्यकारी जि.प.नांदेड, समाज कल्याण नांदेड इत्यादी ना देण्यात आले.
या शिष्टमंडळात दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर, जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, विठ्ठल माने,विद्याधर गिरे, दिंगाबर लोणे, मगदुम शेख इत्यादी होते