pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

शासकीय निवासी शाळेतील प्रवेश प्रक्रिया सुरु

0 1 2 1 1 2

जालना/प्रतिनिधी,दि. 14

सामाजिक न्याय विभागातंर्गत जालना जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळेमध्ये अनुसूचित जाती- जमाती तसेच विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग व अपंग यांच्याकरीता इयत्ता सहावी ते दहावीसाठी प्रवर्गनिहाय जागा निश्चित आहेत. तरी जिल्ह्यातील शासकीय निवासी जालना, बदनापूर व भोकरदन येथील एकुण तीन शाळेत प्रवेशासाठी दि.30 जुन 2023 पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त दत्तात्रय वाघ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
अनुसूचित जाती- जमाती तसेच विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग व अपंग यांना शासकीय निवासी शाळेतील रिक्त जागेवर पात्रतेनूसार प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेश प्रक्रिया पुर्ण झाल्यावर प्रवेशित विद्यार्थींनी-विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन व शैक्षणिक साहित्य पुरविण्यात येईल. शासकीय निवासी शाळा जालना शहरात जिल्हा सामान्य रुगणालयाच्या पाठीमागे मुलींची शासकीय निवासी शाळा, बदनापूर येथे ग्रामीण रुग्णालयाशेजारी मुलांची शासकीय निवासी शाळा आणि भोकरदन शहरात मुलांची शासकीय निवासी शाळा प्रवेशासाठी मुख्याध्यापकांशी संपर्क साधून प्रवेश निश्चित करावा. असे सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 1 2