मराठा आरक्षणासाठी रॅलीमुळे 12 जुलै रोजी वाहतूक मार्गात बदल

जालना/प्रतिनिधी,दि.10
शुक्रवार, दि. 12 जुलै 2024 रोजी मराठा आरक्षण जनजागृती संबंधाने भव्य शांतता रॅली व सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने मराठा समाजाचे नागरीक छत्रपती संभाजी महाराज पुतळा या ठिकाणी एकत्र येऊन छत्रपती संभाजी महाराज पुतळा – शनि मंदीर- गांधी चमन- मंमादेवी- डॉ. सुभाषचंद्र बोस चौक- पाणीवेस –काद्राबाद- छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अशा मार्गाने रॅली काढणार आहेत व छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येथे रॅलीची सांगता होवुन सभेत रुपांतर होणार आहे. सदर रॅलीस व सभेस अडथळा निर्माण होऊ नये, रस्ता मोकळा राहावा व रस्त्यावर वाहने उभी राहुन मार्गात वाहनांमुळे अडथळा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नमुद मार्गावरील वाहतुक पर्यायी मार्गाने वळवण्याबाबत प्रभारी पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी आदेश जारी केले आहेत. हा आदेश दि. 12 जुलै 2024 रोजी सकाळी 08.00 वाजेपासुन ते रॅली संपेपर्यत अंमलात राहील.
आदेशाप्रमाणे छत्रपती संभाजीनगरकडुन जालना विशाल कॉर्नर, मोतीबाग बायपास रोडने अंबड, घनसावंगी व मंठाकडे जाणारी वाहतुक ही ग्रेडर टी पॉईन्ट, बायपास रोड, कन्हैया नगर, नाव्हा चौफुली, मंठा चौफुली मार्गे जाईल.
मंठा, घनसावंगी, अंबडकडुन येणारी आणि छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, सिल्लोडकडे जाणारी वाहतुक ही अंबड चौफुली, मंठा चौफुली, कन्हैयानगर मार्गे जाईल.
तसेच विशाल कॉर्नर, मोतीबागकडून येणारी व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळया समोरुन जुना जालना परीसरात जाणारी वाहतुक ही मोतीबाग गार्डन, अंबड चौफुली, नूतन वसाहत मागें जाईल व येईल.
गणपती गल्ली, बाजार चौकी, परीसरातील येणारी व गांधी चमन मार्गे नवीन जालनाकडे जाणारी वाहतुक ही जामा मस्जीद, कैकाडी मोहल्ला, राजा मिया साब दर्गा, रामतिर्थ पुल मार्गे जाईल व येईल.
दिपक हॉस्पीटल, माळीपुराकडुन येणारी व गांधी चमन मार्गे नवीन जालना शहरात जाणारी वाहतुक ही विठ्ठल मंदीर, पेशवा चौक, लक्कड कोट मार्गे जाईल व येईल.
नुतन वसाहत, शनि मंदीर, मार्गे नविन जालना शहरात जाणारी वाहतुक ही अंबड चौफुली, मंठा चौफुली मार्गे जाईल व येईल.
रेल्वे स्टेशनकडुन गांधी चमन, मंमादेवी मार्गे नवीन जालना शहरात जाणारी वाहतुक ही अंबड चौफुली, मंठा चौफुली मार्गे जाईल व येईल.
रेल्वे स्टेशनकडुन निरामय हॉस्पीटल, मंमादेवी मार्गे नवीन जालना शहरात जाणारी वाहतुक ही नुतन वसाहत अंबड चौफुली, मंठा चौफुली मार्ग जाईल व येईल.
बसस्थानककडुन फुलंब्री नाट्यगृह तसेच वाहतुक शाखा कार्यालय मार्गे येणारी व सुभाष चौकातुन पाणीवेस, जवळुन शिवाजी पुतळा मार्ग मंठा चौफुली कडे जाणारी वाहतुक ही बसस्थानक, मामा चौक, सदर बाजार, जे.ई.एस. कॉलेज, पोलीस ट्रेनिंग सेंटर, गुरु बच्चन चौक मार्गे जाईल व येईल.
सिंधी बाजार, सदर बाजार, बडी सडक, मामा चौक, महाविर चौक परीसरातुन येणारी व सुभाष चौक मार्गे जुना जालना शहरात जाणारी वाहतुक ही जे.ई.एस. कॉलेज, जिजामाता प्रवेशद्वार, मंठा चौफुली, अंबड चौफुली, नुतन वसाहत मार्गे जाईल व येईल.
मंगळ बाजार, गोल मस्जीद, चमडा बाजार, पंचमुखी महादेव मंदीर या परीसरातील सुभाष चौक मार्गे जुना जालना शहरात जाणारी वाहतुक ही राजमहेल टॉकीज समोरील पुलावरुन, ग्लोबल गुरुकुल शाळा, बायपास रोड, अंबड चौफुली, नुतन वसाहत मार्गे जाईल व येईल.
संभाजीनगर भागातुन बसस्थानक, मामा चौक, सदर बाजार मार्गे, मंठा चौफुलीकडे जाणारी वाहतुक ही-गोल्डन जुबली स्कुल, संतोषीमाता रोड, विवेकानंद हॉस्पीटल, जिजामाता प्रवेशद्वार मार्ग जाईल व येईल.
गांधीनगर, रामनगर कडुन येणारी व शिक्कलकरी मोहल्ला मार्गे सदर बाजार, बडी सडक, जिजामाता प्रवेशव्दार कडे जाणारी वाहतुक ही आझाद मैदान, गुरुबच्चन चौक, जिजामाता प्रवेश व्दार, झाशी राणी चौक मार्गे जाईल व येईल.
मंठा चौफुलीकडून येणारी व छ. शिवाजी महाराज पुतळा मार्गे सदर बाजार, बसस्थानक कडे जाणारी वाहतुक ही, गुरु बच्चन चौक, जिजामाता प्रवेश व्दार, झाशी राणी चौक मार्गे जाईल व येईल. हा आदेश दि. 12 जुलै 2024 रोजी सकाळी 9.00 वाजे पासुन ते रॅली संपेपर्यंत अंमलात राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.