pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

गंगापूर छत्रपती संभाजीनगर सेवा सुशासन व गरीब कल्याणाचे मंत्र भाजपाने आत्मसात केला- उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस

0 1 1 8 2 2

छ संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.1

गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जल जीवन मिशन अंतर्गत ३७३ गावे गंगापूर-वैजापूर ग्रीड पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उपमुख्यमंत्री आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की भाजपाने सेवा, सुशासन,आणि गरीब कल्याणाचा हा मंत्रआत्मसात केला आहे. म्हणजे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणे विविध विकासाचे योजना राबवणे ह्या गरीब कल्याणाच्या दृष्टीने तयार करून त्यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. असे देवेंद्रजीं फडणवीस यांनी आपल्या भाषणात म्हणाले.
याप्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.श्री.रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना.श्री.भागवत कराड, सहकार मंत्री श्री अतुल सावे,माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार श्री.हरिभाऊ बागडे, आमदार श्री.प्रवीण दरेकर, आमदार श्री.प्रशांत बंब, भाजपा प्रदेश सरचिटणीस श्री संजय केणेकर भाजपा जिल्हाध्यक्ष श्री विजयराव औताडे भाजपा शहर जिल्हाध्यक्ष श्री शिरीष बोराळकर पदाधिकारी, कार्यकर्ते व असंख्य नागरिक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 2 2