pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

0 1 7 4 0 6

जालना/प्रतिनिधी,दि. 22

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघ आणि न्यायालयीन अधिकारी-कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एम. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात दि. 22 जुन 2023 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
यावेळी आयोजित योग शिबीरात योगतज्ञ निवृत्त जिल्हा न्यायाधीश तथा अति सह जिल्हा न्यायाधीश केशवराव इप्पर व मंगलताई केशवराव इप्पर यांनी आपल्या जीवनात योगाचे महत्व याबद्दल माहिती दिली. तसेच योग प्रशिक्षण दिले. यावेळी न्यायीक अधिकारी, विधीज्ञ, कर्मचारी यांनी या योग शिबीराचा लाभ घेतला. योग शिबीराचे आयोजन करण्यासाठी सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती पी.पी. भारसाकडे-वाघ, व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे