निबंध स्पर्धेमध्ये यश!

जालना/प्रतिनिधी, दि.26
जालना: येथील हिंदू समाज संस्था संचलित कै. बाबुराव जाफ्राबादकर माध्यमिक विद्यालयाच्या कु. अदिती नीरज राय( वर्ग आठवा ) अनन्या वाघमारे( वर्ग आठवा) अश्विनी मुळे( वर्ग आठवा) संध्या पांगारकर( वर्ग आठवा) यांनी पंचायत राज दिनानिमित्त आपले गाव, सुंदर, स्वच्छ आणि आदर्श कसे बनवता येईल? तसेच माझ्या स्वप्नातील गाव या विषयावर निबंध स्पर्धेमध्ये मध्यम गटामध्ये उत्तेजनार्थ बक्षीस मिळवल्याबद्दल भोकरदन मतदारसंघाचे आमदार संतोष दानवे पाटील, महिला भाजप आघाडीचे अध्यक्ष शुभांगी देशपांडे , संध्या देठे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. त्यांना उपक्रमशील शिक्षक संदीप इंगोले यांनी मार्गदर्शन केले.या यशाबद्दल हिंदू समाज संस्थेचे अध्यक्ष ॲड.संजीव देशपांडे सचिव चंद्रशेखर वाघमारे, संचालक कुमार देशपांडे,नितीन कोळेश्वर, जुगल किशोर भक्कड सर्व संचालक मंडळ , शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. मीनाक्षी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.