परीसरात प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमाने साजरा

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.27
हदगाव तालुक्यासह बरडशेवाळा पळसा मनाठा बामणी फाटा पिंपरखेड मार्लेगाव नेवरी नेवरवाडी तांलग उंचाडा करमोडी शिबदरा जगापुर माळ सावरगांव चिंचगव्हान माळझरा कार्ला खरबी चोरंबा केदारनाथ पिंगळी गारगव्हान कवाना रुई चेंडकापुर सह परिसरातील शाळा महाविद्यालय ग्रामपंचायत कार्यालयासह ठिक ठिकाणी शुक्रवार सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.तर प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम करण्यात आले .
बरडशेवाळा येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आले.यावेळी गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ.एस बी.भिसे तलाठी बि.यु.ईप्पर ग्राम विकास अधिकारी संदिप शहारे बिट जमादार श्याम वडजे. मध्यवर्ती बँक शाखा व्यवस्थापक भुसावळे, रोखपाल पि.टी.पावडे,मुख्याध्यापक सुर्यवंशी मुख्याध्यापक कॅम्प एम.एस.कदम शिक्षक शिक्षीका गावातील प्रतिष्ठित नागरिक अंगणवाडी सेविका मदतनीस आरोग्य विभागातील कर्मचारीवर्ग गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.